फिर्यादी ने सांगितले महीती नुसार की मी शिक्षण आय.टी.आय.येथे वायरमण ट्रेड मधे शिकत असुन माझे वडील शेती करतात. आई आंगणवाडी जाते. मागील तीन महिन्या पासुन मी राजेंद्र कदम यांच्या पेट्रोल पंपावर काम करत होतो. मला पगार नाही दिली म्हणुन मी घरी बसून होतो. मला नेहमी कामाला ये म्हणत. पगार देतो तू कामाला तर ये अस म्हणाले म्हणून मी १६ मार्च ला मी पुन्हा कामावर आलो. नंतर मी पगार मागितली असता म्हणाले की पेट्रोल कमी टाक व तुझी पगार काढ. असे बोल्यामूळे मी पुन्हा घरीच राहिलो. नंतर माझ्या आई च्या मोबाईल वर २४/३/२०२२ रोजी सायंकाळी. ६.५२ राजा कदम यांचा फोन आला की मुलाची पगार देतो त्याला पाठऊन द्या . मी ७ वा. पेट्रोलपंप गेलो असता मला गोड बोलून त्यांच्या ऑफिसात नेले व शिव्या देत मला मरायला सुरवात केली.

तेवढ्यात त्यांचा मुलगा अभिषेक कदम ही आला. त्याने ही मला मारण्यास सुरवात केली.मला लाकडी दांडक्याने मारले. झालेली घटना मी बार्शी पोलीस ठाण्यात सांगितली व फिर्यादी ला मारले असल्याने मेडिकल साठी बार्शीशहरातील ग्रामीण रुग्णालय पाठले असता त्यांनी उस्मानाबाद येथील सरकारी रुग्णालय पाठले सदर माहिती आधारे पोलिसानी गुन्हाभारतीय दंड संहिता १८६०नुसार ३२३,३२४, ३४,५०४,५०६ या आंतरगत गुन्हा नोंदवून पुढील तपास करत आहेत.
More Stories
महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकाराच्या कीर्तनसेवेचा मुळेवाडीनगरीत घुमणार गजर
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले
जी. डी. सी. अँन्ड ए. व सी. एच. एम. परिक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदवाढ