Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > ताज्या > बार्शीत श्री गणेश रोड तरुण गणेश मंडळाच्या सहकार्याने लसीकरण शिबीर संपन्न

बार्शीत श्री गणेश रोड तरुण गणेश मंडळाच्या सहकार्याने लसीकरण शिबीर संपन्न

मित्राला शेअर करा

बार्शी : शहरातील श्री गणेश रोड, रोडगा रस्ता येथे श्री गणेश रोड तरुण गणेश मंडळाच्या सहकार्याने घेण्यात आलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण शिबीरात नागरिकांनी चांगला प्रतिसाद देत सुमारे 421 जणांना लस देण्यात आली.

मंडळाच्या वतीने नागरिकांसाठी मंडपाची व टेबलाची तसेच रिक्षांची मोफत सोय करण्यात आली होती.लसीकरण मोहिमेसाठी बार्शी तालुका आरोग्य विभाग व राष्ट्रीय नागरी आरोग्य विभाग यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

माजी मंत्री दिलीप सोपल यांनी या लसीकरण शिबीरास भेट दिली.

यावेळी बोलताना सोपल म्हणाले की,कोरोना हा विषाणू आजार महाभयंकर असून कोरोना वर लस हा उत्तम पर्याय असून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसून येत आहे त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी लस घ्यावी असे आवाहन केले.
यावेळी शिबीरात 289 नागरिकांना लसीचा पहिला डोस व 132 नागरिकांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला.
मंडळाच्या वतीने नागरिकांना कोरोना विषयी लसीकरण मोहीमेची जनजागृती करण्यात आली तसेच नागरिकांचे मोफत रजिस्ट्रेशन करुन त्यांचे व्हेरिफिकेशन करुन प्रमाणपत्र देणे आदी कामे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मोफत करुन दिली.

तालुका वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.अशोक ढगे यांनी लस उपलब्ध करुन दिली तसेच राष्ट्रीय नागरी आरोग्य कर्मचारी यांनी नागरिकांना लस देण्यासाठी कर्तव्य बजावले.


लसीकरण शिबीरासाठी श्री गणेश रोड तरुण गणेश मंडळाचे संस्थापक अध्यक्ष महेश यादव, संतोष जाधवर, अध्यक्ष अमोल हिंगमिरे, उपाध्यक्ष अमोल वायचळ,विनोद उमाटे, योगेश कारंजकर, नागेश काशिद,संजय मंडगे, राजाभाऊ पैकीकर, समथ बोटे,रोहित चंद्रशेखर,रोहन सुपेकर, धनंजय लिगाडे, रामचंद्र घोंगडे आदींसह कार्यकर्ते यांनी विशेष परिश्रम घेतले.