Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > ताज्या > बार्शीतील पत्रकारांना रेनकोटचे वाटपव्हॉईस ऑफ मीडिया बार्शी शाखेचा उपक्रम

बार्शीतील पत्रकारांना रेनकोटचे वाटपव्हॉईस ऑफ मीडिया बार्शी शाखेचा उपक्रम

बार्शीतील पत्रकारांना रेनकोटचे वाटपव्हॉईस ऑफ मीडिया बार्शी शाखेचा उपक्रम
मित्राला शेअर करा

बार्शी : येथील पत्रकारांसाठी पावसाळ्यातील रेनकोटची आवश्यकता ओळखून शहराध्यक्ष हर्षद लोहार यांच्या संकल्पनेतून अनोखा उपक्रम राबविण्यात आला. सोमवारी दि.२९ रोजी संघटनेच्या कार्यालयात राज्याचे महासचिव गणेश शिंदे यांच्या हस्ते रेनकोटचे वाटप करण्यात आले.

व्हॉईस ऑफ मीडिया ही जगभरातील विवीध ४३ देशात कार्यरत असलेली, देशतील सर्वात जास्त कार्यरत सदस्य असलेली संघटना असून विविध भाषा व प्रांतानुसार उपशाखा आहेत. प्रिंट मीडिया, इलेक्ट्रोंनिक मीडिया, साप्ताहिक विंग, रेडिओ विंग, डिजिटल मीडिया विंग अश्या वेगवेगळ्या माध्यमातील स्वतंत्र शाखा नियमित कार्यरत आहेत. पत्रकारांचे आरोग्य, पत्रकारांचे कौशल्य, पत्रकारांच्या मुलांचे शिक्षण, पत्रकारांचे निवास अश्या मूलभूत गरजांची पूर्तता करणे तसेच इतरही प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी यशस्वी झालेली संघटना आहे.

व्हॉईस ऑफ मीडिया बार्शी शहर शाखेच्या वतीने राज्यस्तरीय संमेलन, कार्यशाळा, पत्रकारांच्या कुटुंबियांची आरोग्य तपासणी, पत्रकारांच्या मुलांसाठी शालेय साहित्य, करियर मार्गदर्शन असे विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत.

यावेळी शहराध्यक्ष हर्षद लोहार, उपाध्यक्ष विजय शिंगाडे, सचिव जमीर कुरेशी, कार्याध्यक्ष मयूर थोरात, खजिनदार प्रविण पावले, मल्लिकार्जुन धारूरकर, प्रदिप माळी, शाम थोरात, उमेश काळे, श्रीशैल्य माळी, भूषण देवकर, समाधान चव्हाण, अपर्णा दळवी, विक्रांत पवार, संगीता पवार, आमीन गोरे, अमोल आजबे, संदीप आलाट, सुवर्णा शिवपुरे, नितीन भोसले, प्रभुलिंग स्वामी उपस्थित होते.