बार्शी – इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बेने घेतलेल्या संयुक्त प्रवेश परीक्षेचा (जेईई अॅडव्हान्स) निकाल जाहीर केला आहे. यामध्ये बार्शी शहरातील अक्षय संजय जाधव हा विद्यार्थी ओपन मध्ये ६५०२ वी तर ई डब्ल्यू एस मध्ये ८०२ वी रँक मिळवत तर वैष्णवी शरद फुरडे-पाटील ही विद्यार्थिनी ई डब्ल्यू एस मध्ये ४९४२ वी रँक मिळवत आयआयटी प्रवेशासाठी पात्र झाले आहेत. दोन्ही विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश बार्शीकरांसाठी भूषणावह असेच आहे.
अक्षयची जाधव गुणवत्तेची झलक ही चौथी मध्ये दाखवली होती. तो स्कॉलरशिप मध्ये राज्यात ९ वा तर इयत्ता ८ मध्ये ही राज्यात ३ रा आला होता. सहावी सातवी मध्ये ही एमटीएस परीक्षेत तो राज्यात पहिला आला होता. त्याचे दहावीचे शिक्षण सुलाखे हायस्कूल मध्ये झाले. बारावीला तो लातूरच्या त्रिपुरा कनिष्ठ महाविद्यालय शिकत होता. त्यांच्या यशामध्ये वडील संजय जाधव तसेच वेळोवेळी मार्गदर्शन करणारे गौतम कांकरिया, सुलाखे हायस्कूल मधील शिक्षक यांचा मोलाचा वाटा आहे.
तर वैष्णवी फुरडे-पाटील ही बार्शी नगर पालिकेचे माजी नगरसेवक शरद ( काका ) फुरडे-पाटील यांची कन्या आहे. तिचे शिक्षण बार्शीतील नवीन मराठी शाळा, माध्यमिक शिक्षण सुलाखे हायस्कूल महाविद्यालयीन शिक्षण डॉ. चंद्रभानू सोनवणे महाविद्यालय, उक्कडगाव येथे झाले आहे. वैष्णवी ही इयत्ता चौथी व आठवी स्कॉलरशिप मिळवलेली आहे. नवोदय विद्यालय साठीही पात्र ठरली होती. वैष्णवीने जेईई मेन्स मध्ये ९२ टक्के मिळवत जेईई ऍडव्हान्स परीक्षेसाठी पात्र ठरली होती. तसेच एमएचटी- सीईटी परीक्षेत ९९.७६ टक्के गुण मिळवले आहेत. या दोघांच्या यशाचे कौतुक होत आहे.
जेईई अॅडव्हान्ससाठी देशभरातुन १,५५,५३८ विद्यार्थी बसले होते. त्यातील ४०,७१२ जण उत्तीर्ण झाले आहेत. तर देशभरात असलेल्या आयआयटी कॉलेजमध्ये १६,७०० जागा आहेत.
More Stories
राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत छत्रपती बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या 11 खेळाडूंचे उज्ज्वल यश
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नवीन नोंदणीसाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद