Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > क्रीडा > बार्शीतील बुद्धिबळ स्पर्धेत खुुल्या गटात शंकर साळुंकेला अजिंक्यपद

बार्शीतील बुद्धिबळ स्पर्धेत खुुल्या गटात शंकर साळुंकेला अजिंक्यपद

बार्शीतील बुद्धिबळ स्पर्धेत खुुल्या गटात शंकर साळुंकेला अजिंक्यपद
मित्राला शेअर करा

सोलापूर डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशन च्या मान्यतेने अग्रसेन महाराज जयंतीनिमित्त अग्रवाल समाज बार्शी प्रायोजित बुध्दीबळ स्पर्धेत खुल्या गटात बार्शीतील शंकर साळुंके यांनी सातही सामने जिंकत विजेतेपद तर मुंबईच्या वसिम बसाडे ने उपविजेतेपद पटकावले. तर प्रसन्न जगदाळे, अक्षरा देशमाने व ध्रुव पाटील यांनी अनुक्रमे 15, 13 व 11 वर्षे वयोगटातील विजेतेपद पटकावले.

रविवार दिनांक 02ऑक्टोबर 2022 रोजी बार्शीतील मातृमंदीर येथे स्मार्ट ॲकॅडमी चे सचिन वायकुळे सर यांच्यासह योगेश अग्रवाल, प्रेम अग्रवाल, धीरज अग्रवाल यांचे शुभहस्ते महाराजा अग्रसेन महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करुन स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.

स्पर्धेत एकूण 139 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. सर्व यशस्वी खेळाडुंना प्रमुख अतिथी डाॅ.प्रिती टिपरे पोलीस उपायुक्त सोलापूर शहर व अग्रवाल परिवारातील श्रीमती. आशादेवी अग्रवाल, सुनील अग्रवाल, अविनाश अग्रवाल, यांचे हस्ते चषक, रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेचे मुख्य पंच म्हणून अभिजीत बावळे व नितीन अग्रवाल यांनी काम पाहिले.
स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी चेस क्लब बार्शीचे प्रा. चंद्रकांत उलभगत, विद्याधर जगदाळे, दत्तात्रय गोरे, दळवी सर, सुहास शेटे आदिंनी सहकार्य केले.सर्व विजेत्या खेळाडूंचे सोलापूर डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशन चे सचिव सुमुख गायकवाड यांनी अभिनंदन केले.

स्पर्धेतील संपूर्ण निकाल पुढील प्रमाणे..
खुला गट ओपन
1 – शंकर साळुंके
2 – वसिम बसाडे
3 – दिनेश पाटील
4 – चंद्रकांत पवार
5 – पारस अन्नदाते
U-15
1 – प्रसन्न जगदाळे
2 – सान्वी गोरे
3 – सोहम कुटे
4 – संपदा बोळे
5 – विश्वजीत शिंदे
U-13
1 – अक्षरा देशमाने
2 – सोहम शेटे
3 – अमेेय मिरगणे
4 – सिद्धी शरणार्थी
5 – सार्थक भोंग
U-11
1 – ध्रुव पाटील
2 – नोमान करमाळकर
3 – शिवतेज पाटील
4 – वेदांत मुसळे
5 – अखिलेश जावळे
U-09
1 – समर्थ शरणार्थी
2 – आदित्य डोके
3 – श्रेयस जगताप
4 – जलदक्ष बावळे
5 – आरव नाळे
U-07
1 – समृृद्धी मुसळे
2 – प्रेयस वाघमारे
3 – अद्वैत बोराडे
4 – श्लोक येवनकर
5 – सिद्धांंत कोठारी