Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > सोलापूर/उस्मानाबाद > बार्शीतील उद्योगपती इक्बाल पटेल यांना दिली राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष पदाची जबाबदारी

बार्शीतील उद्योगपती इक्बाल पटेल यांना दिली राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष पदाची जबाबदारी

बार्शी येथील उद्योगपती इक्बाल पटेल यांचा सोलापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
मित्राला शेअर करा

बार्शी: येथील उद्योगपती इक्बाल पटेल यांनी सोलापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला.

जिल्हाध्यक्ष यांनी पटेल यांना त्यांच्यावर जिल्हा उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. यावेळी पटेल यांच्यासमवेत बार्शीचे राष्ट्रवादीचे नेते विश्वास बारबोले, वैरागचे उपनगराध्यक्ष निरंजन भूमकर, उद्योजक जॉन चोप्रा उपस्थित होते. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या विचाराने प्रेरित होऊन पटेल यांनी देखील जिल्ह्यामध्ये पक्षाचे संघटन वाढवणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन बळीराम साठे यांनी केले.

विश्वास बारबोले म्हणाले, इक्बाल पटेल सामाजिक जाणीव असलेले व्यक्तिमत्त्व असून त्यांचे कार्य पक्ष वाढीसाठी मोलाचे ठरणार आहे. पटेल यांनी बार्शीत अनेक उपक्रमांना साथ दिली आहे, त्यामुळे निश्चितच व पक्ष संघटन मजबूत होईल. इक्बाल पटेल यांनीही यावेळी आपले विचार व्यक्त केले. यावेळी बार्शीचे माजी नगरसेवक शंकर देवकर , बाळासाहेब पवार, बंडू वाणी, इम्तियाज तांबोळी, सलीम पठाण उपस्थित होते.