गेट २०२२ ‘ या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेमध्ये स्वप्नील सुधीर काकडे तेजश्री भारत लेंडवे, मोनाली अरुण नागटिळक, आर्वी राजेश कवडे, मंदार जिवाजी मिसाळ, प्रितीश बाबू ऐवळे स्वप्नील सुधीर काकडे विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे हे सर्व स्वेरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत.
राष्ट्रीय स्तरावरील ‘ गेट ‘ या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या अंतर्गत आणि आय.आय.एस.सी. आणि आय आय.टी. या उच्च तंत्रशिक्षण संस्थांच्या माध्यमातून घेतल्या या परीक्षेमध्ये स्वेरीच्या विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले आहे ही परीक्षा अत्यंत अवघड स्वरूपाची असून या परीक्षेत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची आणि उत्तम करिअरची दारे खुली होत असतात.
स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बी.पी.रोंगे यांचे विद्यार्थ्यांसाठीचे विकासात्मक धोरण , नियोजनात्मक मार्गदर्शन आणि उच्च शिक्षित प्राध्यापकांच्या सहकार्यानि स्वेरीत ‘ गेट ‘ परीक्षेची तयारी करून घेतली जाते. त्यामुळे स्वेरीतील विद्यार्थी घवघवीत यश मिळवित आहेत. तसेच ‘ गेट ट्यूटर या ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ‘ गेट ‘ संदर्भात अधिक माहिती मिळून परीक्षेच्या दृष्टीने सखोल तयारी करण्यास मदत मिळते.
गेट ही परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी आय. आय. टी. एन, आय.टी. सारख्या संस्थांमध्ये प्रवेश मिळतो त्याबरोबरच या परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ‘ पब्लिक सेक्टर मधील कंपन्यांमध्ये चांगल्या वेतनाच्या आणि उच्चपदाच्या नोकरीसाठी संधी मिळतात. स्वेरीचे अभियांत्रिकी महाविद्यालय हे वार्षिक परीक्षांचे निकाल, प्लेसमेंट या महत्वाच्या बाबीमध्ये काम अग्रेसर राहिलेले आहे. गेट परीक्षेत उज्वल यश मि ळवलेल्या या सहाही विद्याथ्यांचे स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बी पी. रोंगे. संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे उपाध्यक्ष अशोक भोसले यांच्यासह इतर विश्वस्त व पदाधिकारी यांच्यासह प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व पालकांनी अभिनंदन केले आहे.
More Stories
बियाणे, औषधे व खते यासाठी महा डीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन
विश्वकर्मा प्रतिष्ठानच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन
पुण्याच्या एमआयटी विद्यापीठाचा जेष्ठ संपादक राजा माने यांना ‘समर्पित जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर