भैरवनाथ शिक्षण संस्था संचलित श्री संतोष गुळमिरे प्राथमिक विद्यामंदीर बार्शी आणी ओन्ली समाजसेवा ग्रुपचे सदस्य श्री गणेश कदम हे आपल्या मुलींचा वाढदिवस गेले दोन तीन वर्ष वेगवेगळे उपक्रम घेवुन वाढदिवस साजरा करत असतात.

त्यांची छोटी मुलगी जागृती गणेश कदम हिचा वाढदिवस दी 22 फेब्रुवारी या दिवशी होता यावेळी त्यांनी वृक्ष संवर्धन समितिचे काम पाहुन समितीचे अध्यक्ष उमेश काळे याच्यांशी संपर्क करुन मुलीच्या वाढदिवसाला निधी दिला.
त्याचबरोबर ओन्लि समाज सेवा ग्रुपचे समाजिक कार्य पाहुन ग्रुपचे अध्यक्ष राहुल वाणी यांना भेटुन ग्रुपला देणगी दिली तसेच डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन नगरपालिका शाळा क्र १८ शाळेच्या गणगले मॅडम यांना भेटुन शाळेला मुलांसाठी वह्या आणी खाउवाटप केले.तसेच त्यांच्या श्री संतोष गुळमिरे प्राथमिक विद्यामंदिर बार्शी शाळेतील त्यांच्या वर्गातील मुलांना वह्या शालेय साहीत्य आणी खाऊवाटप केले. दोन्ही मुलीचे वाढदिवस अशाच रितीने साजरा करु असे त्यांनी शेवटी सांगीतले.
More Stories
शाकंभरी नवरात्रोत्सवात आकाशात अवतरली भवानी माता; ३०० ड्रोनने साकारला भक्तीचा अद्भुत सोहळा
नव्या वर्षात महिलांसाठी कौशल्यपूर्ण संवाद सक्षमीकरणावर भर देणार – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
लाडोळे मार्गे वैराग ते उपळे रस्त्याची अवस्था दयनीय; ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल