भगवंत महोत्सव श्री भगवंत देवस्थान, बार्शी नगर परिषद व भगवंत बहुउद्देशीय संस्था, भगवंत महोत्सव समितीच्या वतीने श्री भगवंत प्रकटोत्सवानिमित्त आयोजित सांस्कृतिक महोत्सवातील कार्यक्रम पत्रिकेचे प्रकाशन आमदार राजाभाऊ राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी भगवंत देवस्थानचे अध्यक्ष दादासाहेब बुडूख, मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण, भगवंत महोत्सव समितीचे अध्यक्ष सुभाष शेठ लोढा, विजयकिशोर सोमाणी, विलास आप्पा रेणके, संतोष सूर्यवंशी, श्रीधर कांबळे, मुन्नाशेठ सोनिग्रा, वासुदेव ढगे, अजितशेठ कुंकूलोळ, मुकुंद कुलकर्णी, नाना सुरवसे आदी मान्यवर उपस्थित होते.
More Stories
मराठा समाजास कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात येणार, गावपातळीवर समित्या गठीत करण्याबाबत शासन निर्णय
‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धे’चे अर्ज सादर करण्यास आज शेवट मुदत
कर्मवीर विद्यालय चारे येथे चित्रकला मार्गदर्शन शिबिर