मोहिनी एकादशी व द्वादशीला असलेला श्री भगवंत प्रकोटोस्तव निमित्त बार्शी येथील भूमी डेव्हलपर्सचे संदीप नागणे यांनी भगवंत मंदिरात आकर्षक अशी फुलांची सजावट केली आहे. मंदिरात केलेली फुलांची सजावट पाहण्यासाठी व फोटो काढण्यासाठी भाविकांनी सकाळ पासून मोठी गर्दी केली आहे.

मागील सहा दिवसांपासून सुरू असलेला भगवंत महोत्सवाचे बार्शीतील वातावरण भक्तिमय, भगवंत मय झाले आहे. उद्या पहाटे ४ पासून भगवंत मंदिरात ह.भ.प. ॲड जयवंत बोधले महाराज यांचे कीर्तन व भगवंत महापूजा, नगर प्रदक्षणा, महाप्रसाद यासह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
याचसाठी मागील सहा दिवसांपासून मंदिरात विद्युत रोषणाई, फळे, फुले यांची आकर्षक सजावट करण्यात येत आहे. एकादशी व द्वादशी अर्थात भगवंत प्रकोटोत्सव निमित्त आमदार राजेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली भूमी डेव्हलपर्स बार्शीचे तानाजी मारुती नागणे, सुमन तानाजी नागणे, संदीप तानाजी नागणे यांनी फुलांची सजावट करण्याची इच्छा संयोजन समितीकडे केली होती.
त्या प्रमाणे बार्शी येथील नागणे परिवाराने फुलांची आकर्षक सजावट साकारली आहे. या बाबत माहिती देताना भूमी डेव्हलपर्स बार्शी चे एम. डी. संदीप नागणे म्हणले की भगवंत मंदिर गाभारा, शिखर व परिसरात सुमारे दोन हजार किलो फुलांचा वापर करण्यात आला आहे. पूर्व द्वार, पश्चिम द्वार येथे फायबर पॅनल व फुलांची सजावट केली आहे.
भगवंत मंदिरातील सजावटीसाठी झेंडू, शेवंती, अस्टर, डच गुलाब, जीप्सो, ऑर्किट आदी फुलांचा वापर करण्यात आला आहे. सजवटी साठी लागणारी फुल बार्शी, सोलापूर, पुणे येथील मार्केट मधून उपलब्ध करण्यात आली आहेत.
अद्याप फुलांच्या सजावटीचे काम पूर्ण झाले नसून आज सायंकाळ पर्यंत ते पूर्ण होईल. फुलांच्या सजावटी बरोबर विद्युत रोषणाई ही करण्यात येणार असल्याचे श्री संदीप नागणे यांनी सांगितले.
More Stories
प्रशिक वाघमारे यांची नवोदय प्रवेश परीक्षेत यश
धाराशिवला भव्य बसपोर्ट उभारण्यासाठी कार्यवाही करा -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम 2.0 विशेष आरोग्य तपासणी मोहिमेचा शुभारंभ