सोलापूर जिल्हा क्रीडा विभाग यांच्या वतीने बार्शी तालुकास्तरीय खो.खो स्पर्धा शिवशक्ती मैदान बार्शी येथे दिनांक तीन व चार सप्टेंबर 2024 रोजी पार पडल्या.

यात सतरा वर्षे मुलांचा संघ विजयी झाला, अन् बार्शी तालुक्यात पुन्हा विजयाचा दबदबा कायम केला. याच स्पर्धेदरम्यान 14 वर्षे मुलींचा गट उपविजेता ठरला. या विजयाचे कौतुक करण्यासाठी प्रशालेने या टीमचा सन्मान सोहळा आयोजित केला.
या वेळी टीमला मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक श्री संतोष कुमार चिकणे सर त्यांना सहकार्य करणारे सत्यवान माळी सर, तसेच क्रांतिसिंह माने सर, यांचा ही सन्मान करण्यात आला. या सर्व टीमला मार्गदर्शन करणारे प्रशालेचे मुख्याध्यापक श्री प्रमोद(पप्पु) देशमुख सर यांचाही प्रशालेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सन्मान केला.
या यशाचे कौतुक गुळपोळी परिसरात होत आहे.
More Stories
महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकाराच्या कीर्तनसेवेचा मुळेवाडीनगरीत घुमणार गजर
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले
जी. डी. सी. अँन्ड ए. व सी. एच. एम. परिक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदवाढ