Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > ताज्या > भैरवनाथ विद्यालयातील श्री.संतोषकुमार चिकणे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त

भैरवनाथ विद्यालयातील श्री.संतोषकुमार चिकणे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त

भैरवनाथ विद्यालयातील श्री.संतोषकुमार चिकणे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त
मित्राला शेअर करा

सोलापूर जिल्हा माध्यमिक शाळा कृती समिती
मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर सहकारी पतसंस्था, मर्या. पंढरपूर जि. सोलापूर यांच्या वतिने सन २०२४:२०२५ चा आदर्श शिक्षक पुरस्कार भैरवनाथ माध्यमिक विद्यालय गुळपोळी या प्रशालेतील श्री. संतोष कुमार नागनाथ चिकणे सर यांना प्राप्त झाला. या पुरस्काराचे वितरण आज पंढरपूर येथील सिंहगड इनस्टीट्युट या संस्थेत पार पडला.

हा सन्मान सोहळा संस्थेचे संस्थापक चेअरमन मा. आ. दत्तात्रय सावंंत सर व सर्व संचालक मंडळ यांच्या‌ उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल प्रशालेचे संस्थापक अध्यक्ष मा. अरूणभाऊ कापसे मुख्याध्यापक श्री प्रमोद (पप्पु) देशमुख सर व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सरांचे कौतुक व अभिनंदन केले.

सरांच्या या पुरस्काराबद्दल परिसरातुन कौतुक होत आहे