सोलापूर दि.11:- सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागामार्फत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमाचे दि. 8 एप्रिल ते 14 एप्रिल 2025 पर्यंतच्या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. तरी विविध कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त, श्रीम. सुलोचना सोनवणे यांनी केले आहे.

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व वंचित दुर्बल घटकातील व्यक्तींच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी राज्य शासनाकडून विविध कल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी तसेच जनतेत जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
दि.08 एप्रिल ते 14 एप्रिल या कालावधीत राज्यात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह हा कार्यक्रम साजरा करण्यासाठी राज्यातील सर्व प्रशासकीय विभागाच्या अधीनस्त सर्व कार्यालयांनी व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या अधीनस्त असणा-या सर्व कार्यालयांना विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे निर्देशा नुसार सहायक समाज कल्याण कार्यालय सोलापूर यांच्या वतीने शुक्रवार दि.11 एप्रिल 2025 रोजी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती निमित्त महात्मा फुले यांच्या सामाजिक कार्याविषयी व्याख्यानाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सात रस्ता सोलापूर आयोजन करण्यात आलेले होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे पाहुणे व व्याख्याते व्याख्याते संघप्रकाश मारुती दुड्डे यांनी महात्मा फुले यांच्या जिवनावर मौल्यवान विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार समाज कल्याण निरीक्षक संजय साळुंखे यांनी मानले. तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन समतादूत श्रीमती अश्विनी सातपुते यांनी केले. सदर कार्यक्रमास सहायक आयुक्त कार्यालयातील सर्व कर्मचारी उपस्थीत होते.
सामाजिक समता सप्ताहा अंतर्गत सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयामार्फत दि. 12 एप्रिल 2025 रोजी मु.पो. हगलूर ता.उ. सोलापूर येथे महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर कार्यक्रमांस जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही समाज कल्याण सहायक आयुक्त श्रीम. सुलोचना सोनवणे, यांनी केले आहे.
More Stories
गोरोबा काकांच्या ७०८ व्या संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त भरगच्च कार्यक्रम
मराठा सेवा संघाच्या बार्शी अध्यक्षपदी संतोष मोळवणे, कोषाध्यक्षपदी कल्याण घळके
वाशी (जि. धाराशिव) येथे शासकीय आयटीआय जागेचा प्रस्ताव तातडीने पाठवा – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे