बार्शी:- बार्शी शहर येथील ९२ कोटी ५४ लाख रुपये मंजूर रस्ते कामाचे भूमिपूजनप्रसंगी बार्शी शहर व तालुक्याच्या विकासासाठी महाराष्ट्र शासनाकडून जास्तीत जास्त निधी खेचून आणला असे आमदार राजेंद्र राऊत यांनी सांगितले.

आमदार राजेंद्र राऊत यांच्या शुभहस्ते राज्य नगरोत्थान योजने अंतर्गत बार्शी शहर येथील पोस्ट ऑफिस चौक ते कुईवाडी रोड शहर हद्द (जैन मंदिर) येथील रस्ता काँक्रीटीकरण करणे व दोन्ही बाजूस पावसाळी गटर बांधकाम करणे व पोस्ट ऑफिस चौक ते जामगांव हद्द (लातूर रोड) येथील रस्ता येथील रस्ता काँक्रीटीकरण करणे व दोन्ही बाजूस पावसाळी गटर बांधकाम करणे यासाठी मंजूर ९२ कोटी ५४ लाख रुपये रस्ते कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
बार्शी शहरात सध्या प्रत्येक कानाकोपऱ्यात विविध प्रकारची अनेक विकास कामे सुरू आहेत, काही कामे पूर्ण झाली आहेत.बार्शी शहरवासीयांना नगरपालीकेच्या माध्यमातून देण्यात येत असलेल्या प्राथमिक गरजा,सोयी सुविधा, त्यांचे नागरी मुलभूत हक्क, कामांच्या अपेक्षा पूर्ण होत असल्यामुळे ते अतिशय समाधानी व आनंदी होत आहेत.
यावेळी मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण, माजी नगराध्यक्ष आसिफभाई तांबोळी, रमेश पाटील, माजी नगरसेवक विलास रेणके, सुभाष लोढा, सुधीर बारबोले, अनिल पाटील, भारत पवार, रमाकांत सुर्वे, कुमार डमरे, नगर अभियंता विवेक देशमुख तसेच नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
More Stories
महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकाराच्या कीर्तनसेवेचा मुळेवाडीनगरीत घुमणार गजर
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले
जी. डी. सी. अँन्ड ए. व सी. एच. एम. परिक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदवाढ