बार्शी मध्ये आपल्या सामाजीक कार्यामुळे शिवसेना नेते भाऊसाहेब अंधळकर यांचे नाव चर्चेत असते.
अगदी वैदिक कालखंडापासुन हिंदू धर्मात गाईला माता किंवा देवतांचा दर्जा दिला जात आहे. ही भावना जोपासत भोयरे येथील गोशाळेला बांधकाम साहित्याच्या स्वरुपात मदत केली.
बार्शी तालुक्यातील भोयरे येथील गुरुदत्त माऊली गोशाळा यासाठी स्वामिनी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक विक्रांत पवार यांनी सोशल मीडियाद्वारे गोशाळेसाठी स्वेच्छेने मदत करण्याचे आव्हान केले होते , या मध्ये ते म्हणाले की ज्यांना कोणाला मदत करायची असेल त्यांनी स्वच्छेने करा ना स्वार्थासाठी ना फायद्यासाठी केवळ कत्तलखान्याकडे जाणारी गोधन सांभाळायचे या हेतूने गोशाळा उभारणीचे कार्य हाती घेतले आहे .
त्यासाठी त्यांनी शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांची भेट घेऊन आपली योजना त्यांच्यासमोर मांडली , त्यांनी तात्काळ तीन ब्रास खडी डस्ट गोशाळेसाठी शिवसेना बार्शी व राजमाता इंदुताई आंधळकर यांच्या सन्मानार्थ भेट म्हणून दिली .
त्याबद्दल त्यांचे विक्रांत पवार यांनी आभार मानले तसेच आतापर्यंत ची सर्वात मोठी मदत गोशाळेला झाली असे विक्रांत पवार यांचे म्हणणे आहे .
विक्रांत पवार यांनी अव्हान केले आहे की जे कोणी गोशाळेच्या उभारणी कार्यात सहभागी होऊ इच्छितात त्यांनी या पुण्यकर्मात आपला हातभार लावावा.
More Stories
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान शेतकऱ्यांनी प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन
कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे कृषि महाविद्यालय, बार्शी येथे प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ संपन्न
बार्शी बसस्थानक व आगाराच्या पुनर्बांधणीसाठी १४ कोटी ९९ लाख ५० हजार मंजूर :- आमदार राजेंद्र राऊत