बार्शी – भाजप संघटन पर्व अंतर्गत बार्शी तालुक्यातील मंडल अध्यक्षांच्या निवडी प्रदेश कार्यालयाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संमतीने जाहीर करण्यात आल्या. या निवड प्रक्रियेची औपचारिक घोषणा आणि निवडपत्र प्रदान समारंभ बार्शी येथील पक्ष कार्यालयात भाजपा निरीक्षक गणेश चिवटे, केकाण, विलास रेणके आणि रणवीर राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. त्यामध्ये, बार्शी शहर प्रमुखपदी महावीर कदम यांची दुसऱ्यांदा निवड करण्यात आली.

नवनिर्वाचित मंडल :
- बार्शी शहर प्रमुख : महावीर कदम
- बार्शी ग्रामीण तालुका प्रमुख : बालाजी गडदे
- वैराग ग्रामीण तालुका प्रमुख : मदन दराडे
या तिन्ही नेत्यांची निवड पक्ष कार्यकर्त्यांच्या सर्वानुमते आणि सखोल चर्चेनंतर अंतिम करण्यात आली. निवड प्रक्रिया पारदर्शक आणि एकसंधपणे पार पाडण्यात आली, ज्यामुळे पक्षांतर्गत एकता आणि समन्वयाचा संदेश कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचला. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना निवडपत्र प्रदान करताना वरिष्ठ नेत्यांनी पक्षाच्या ध्येयधोरणांचे पालन करत जनसेवा, संघटन बळकटीकरण आणि स्थानिक समस्यांचे निराकरण करण्याचे आवाहन केले.
More Stories
ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन संघटनेच्या 80 व्या स्थापना दिनानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न
सेकंडरी स्कूल्स एम्प्लॉईज को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.मुबंईच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त विभागीय स्तरावर विविध स्पर्धांचे आयोजन
राज्यस्तरीय म्युझिकल चेअर स्केटिंग स्पर्धेत बार्शीतील खेळाडूंचे दमदार यश