Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > महाराष्ट्र > श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी मध्ये रक्त तपासणी शिबीर संपन्न

श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी मध्ये रक्त तपासणी शिबीर संपन्न

श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी मध्ये रक्त तपासणी शिबीर संपन्न
मित्राला शेअर करा

बार्शी:- शुक्रवार, दिनांक 27 /12 /2024 रोजी कनिष्ठ विभागांतर्गत कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या 122 व्या जयंतीनिमित्त व सखी सावित्री समिती अंतर्गत Blood Group डिटेक्शन आणि Haemoglobin काऊंटिंग शिबिराचे MCVC विभागामार्फत आयोजन करण्यात आले होते.

सदरील शिबिराचे उद्घाटन संस्थेचे खजिनदार आदरणीय जयकुमार शितोळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळेस कनिष्ठ विभागातील इ. 11 वी व इ. 12 वी कला, विज्ञान व किमान कौशल्य विभागातील 320 विद्यार्थिनींचे व 15 शिक्षक महिला कर्मचाऱ्यांचे HB count आणि Blood Group डिटेक्शन करण्यात आले. किमान कौशल्य विभागाचे प्रमुख डॉ. दिपक जाधवर यांनी प्रास्ताविकातून शिबीरामध्ये रक्तगट व हिमोग्लोबिन तपासणी करण्यात येणार आहे. आपल्या उत्तम आरोग्यासाठी हिमोग्लोबिन टेस्ट करणे आवश्यक आहे असे म्हटले.

श्रीमती डॉ. सुचेता जवान मॅडम यांनी सर्व विद्यार्थीनींची रक्तगट तपासणी केली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. बी शेख सर, उपप्राचार्य प्रा. एम. व्ही. ओव्हाळ, पर्यवेक्षक प्रा. रविंद्र वायकर, कला समन्वयक डॉ. महादेव राऊत तसेच श्रीमती मनीषा चव्हाण, प्रा. सोमनाथ पेटकर, प्रा. बळीराम थोरे, प्रा. प्रेमसागर राऊत, मारुती मोहिते उपस्थित होते. याप्रसंगी शालेय समितीचे चेअरमन मा. नंदनजी जगदाळे व महाविद्यालयाचे प्राचार्यांनी MCVC विभागाच्या सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.