खेळाडूंना शासकीय निमशासकीय सेवेत ५% आरक्षण ठेवलेले असून बोगस क्रीडा प्रमाणपत्र धारण करून क्रीडा विभागाकडून क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी केलेली आहे. तसेच काही उमेदवारांनी शासकीय सेवेचा लाभ घेतला आहे, अशा युवा उमेदवारांना भविष्यात अडचण निर्माण होऊ नये यासाठी एक संधी म्हणून “बोगस क्रीडा प्रमाणपत्र बोगस क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल समर्पण योजना” चा शासन निर्णय घेण्यात आला आहे.
ज्या उमेदवारांनी क्रीडा संचालनालय व विभागीय उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा यांचे यांचेकडून बोगस क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी करून घेतली असेल, अशा उमेदवारांना तसेच त्या आधारे शासकीय, निमशासकीय व इतर कार्यालयामध्ये नोकरी धारण केली आहे अशा उमेदवारांनी मूळ क्रीडा प्रमाणपत्र व मुळ क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य पुणे यांचेकडे व्यक्तीश: अथवा पत्राद्वारे दि. ३१ मे २०२२ पूर्वी समर्पीत करण्यात यावीत अशा उमेदवारांची नावे गोपनीय ठेवण्यात येतील.
मुदतीत बोगस क्रीडा प्रमाणपत्रे व मुळ क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल जमा न केल्यास संबंधीत उमेदवार व संबंधीत क्रीडा संघटना यांचे विरूद्ध फौजदारी कारवाई करण्यात येईल. बोगस क्रीडा प्रमाणपत्रधारक उमेदवारांनी दि. ३१ मे २०२२ पर्यंत आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, शिवछत्रपती क्रीडापीठ, म्हाळूंगे बालेवाडी, पुणे येथे आपला अहवाल सादर करावा, असे आवाहन आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, पुणे श्री ओम प्रकाश बकोरिया, यांनी केले असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
More Stories
राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत छत्रपती बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या 11 खेळाडूंचे उज्ज्वल यश
ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन, १७ खेळाडूंना शूज जोड्यांचे वाटप
श्री शिवाजी महाविद्यालयाच्या पाच खेळाडूंची विद्यापीठ संघात निवड