सन 2024-25 या शैक्षणिक वर्षांमध्ये घेण्यात आलेल्या बार्शी तालुका कुस्ती स्पर्धेमध्ये यशवंत विद्यालय खांडवीच्या विद्यार्थ्यांनी गतवर्षीप्रमाणेच चमकदार कामगिरी केली.

या स्पर्धेमध्ये ओम महादेव यादव (ग्रीको रोमन 17 वर्षे वयोगट) या विद्यार्थ्याने तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. तसेच सुरज रामेश्वर बारंगुळे (फ्री स्टाईल वयोगट 17) या विद्यार्थ्याने द्वितीय क्रमांक पटकावला.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री कौरव आप्पा माने, सचिव श्री यशवंत माने, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. रमेश बारंगुळे, मुख्याध्यापक श्री शिंदे सर व सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. तसेच मार्गदर्शक वस्ताद बालाजी भाकरे, श्रीरंग भाकरे, क्रीडाशिक्षक खोगरे सर यांचेही अभिनंदन केले.
More Stories
मातृभूमी प्रतिष्ठानच्या इनडोअर स्टेडियमचे भूमिपूजन मोठ्या हर्ष उल्हासात संपन्न
५२ व्या शालेय राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात तनवीर तांबोळी चे यश
तेर येथील जिप उर्दू शाळेत उद्या बाल आनंद मेळाव्याचे आयोजन, सहभागी होण्याचे मुख्याध्यापक शहा तय्यबअली महेबुब यांचे आहवान