वार्षिक बजेट म्हणजे सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय आहे कारण काय स्वत होणार काय महाग होणार आहे हे बजेट वरती अवलंबून असते
शासकीय कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी त्याच सोबत डीजील प्रणालीचा जास्तीत जास्त करण्याचे प्रयत्न केले जात आहेत त्याचाच एक भाग म्हणजे आता नवीन ॲपवर 1947 सालापासून ते आतापर्यंतच्या अर्थसंकल्पाची आणि त्यावरील चर्चांची माहिती मिळू शकते.
केंद्रीय अर्थसंकल्प येत्या 1 फेब्रुवारीला संसदेत सादर होणार आहे. त्या दिवशी सकाळी 11 वाजता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण या अर्थसंकल्प सादर करणार आहेत. सामान्य जनतेला या अर्थसंकल्पाची माहिती घेता यावी यासाठी आता केंद्र सरकारने एक मोबाईल ॲप लॉन्च केलं आहे. त्या माध्यमातून इंग्रजी आणि हिंदी भाषेत या अर्थसंकल्पाची माहिती मिळणार आहे. या ॲपचं नाव युनियन बजेट मोबाईल ॲप असं आहे.
केंद्र सरकारच्या या ॲपचं नाव युनियन बजेट मोबाईल ॲप (Union Budget Mobile App) असं आहे. या माध्यमातून अर्थसंकल्पासंबंधी सर्वात विश्वसनिय माहिती घेता येऊ शकेल.
हे ॲप कसं डाऊनलोड करायचं?
युनियन बजेट मोबाईल ॲप हे
https://www.indiabudget.gov.in/downloadapp.php
या लिंकवर क्लिक करून डाऊनलोड करता येऊ शकेल. तसेच गुगल प्ले स्टोअरवरुनही हे ॲप डाऊनलोड करता येऊ शकेल.
डिजिटल संसद ॲप वरही माहिती उपलब्ध.
केंद्रीय अर्थसंकल्पाची माहिती ही डिजिटल संसद ॲप (Digital Sansad App) यावरही उपलब्ध होणार आहे. या माध्यमातून अर्थसंकल्पाचे लाईव्ह अपडेट पाहता येईल. या ॲपच्या माध्यमातून संसदेच्या दोन्ही सभागृहाचे कामकाज आपल्याला लाईव्ह पाहता येणार आहे.
More Stories
राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत छत्रपती बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या 11 खेळाडूंचे उज्ज्वल यश
प्रा. राहुल पालके यांना सोलापूर विद्यापीठाकडून विद्यावाचस्पती ( पी.एच.डी.) प्रदान
बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सूचना: केवायसी प्रक्रिया तातडीने करा!