Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > ताज्या > बार्शीतील प्रा. सुरेश लांडगे यांच्याकडून विद्यार्थ्यांना १ लाख ६८ हजार रुपयांचे क्रीडा साहित्याची भेट

बार्शीतील प्रा. सुरेश लांडगे यांच्याकडून विद्यार्थ्यांना १ लाख ६८ हजार रुपयांचे क्रीडा साहित्याची भेट

बार्शीतील प्रा. सुरेश लांडगे यांच्याकडून विद्यार्थ्यांना १ लाख ६८ हजार रुपयांचे क्रीडा साहित्याची भेट
मित्राला शेअर करा

कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे संस्थेत क्रीडा विषय शिकविणाऱ्या अन् स्वतः खेळाडू असलेल्या प्रा. सुरेश लांडगे यांनी श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या १६ शाखेतील विद्यार्थ्यांना १ लाख ६८ हजार रुपयांचे क्रीडा साहित्य दिले. यामुळे खेळावर प्रेम करणाऱ्या प्रा. लांडगे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सेवानिवृत्तीचा संस्मरणीय क्षण समाजोपयोगी कार्यासाठी खर्च करण्याचा आदर्श घालत प्रा. लांडगे यांनी संस्थेतील सर्व माध्यमिक शाळेला फुटबॉल, व्हॉलिबॉल, नेट, डिस्क, थ्रो बॉल – आदी सुमारे १० हजार ५०० रुपयाचे क्रीडा साहित्य भेट दिले. सुमारे १० हजार ५०० प्रमाणेच १ लाख ६८ हजार रुपये किंमतीचे साहित्य संस्थेचे सचिव पी. टी. पाटील, खजिनदार जयकुमार शितोळे तसेच सर्व पदाधिकाऱ्यांकडे क्रीडा साहित्य सुपूर्द केले.

प्रा. सुरेश लांडगे यांनी यावेळी आपल्या मनोगतात म्हटले की मोबाईलच्या युगामुळे विद्यार्थी मैदानी खेळ खेळत नाहीत. शाळेत चांगल्या दर्जाचे क्रीडासाहित्य असावे आणि देशाची पुढील पिढी शारीरिकदृष्ट्या सक्षम बनावी याच उद्देशाने हा एक छोटासा प्रयत्न केला आहे. अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू आपल्या हातून घडले याचे समाधान आहे.

यावेळी सर्व क्रीडा शिक्षक विद्यालयाचे मुख्याध्यापक यांनी प्रा. सुरेश लांडगे सर यांचे आभार मानत त्यांच्या कार्याची प्रशंसा केली. प्रा. लांडगे यांचे योगदान आमच्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे,