बार्शी :- श्री वर्धमान जैन सार्वजनिक तालुका वाचनालय बार्शी येथे दि. 5 सप्टेंबर 2024 गुरुवार रोजी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष गिरधारीलाल तातेड सर यांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष किशोर श्रीश्रीमाळ, ऑ. सेक्रेटरी आनंद पुनमिया, संचालक धीरज कुंकूलोळ, प्रमोद भंडारी, सुजित गुंदेचा, कमलेश तातेड आदि मान्यवर उपस्थित होते.
त्यानंतर गिरधारीलाल तातेड सर यांचा वाचनालयाचे अध्यक्ष किशोर श्रीश्रीमाळ व संचालक धीरज कुंकूलोळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी वाचनालयाचे सभासद व वाचक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन वाचनालयाचे ग्रंथपाल सुरेश यादव यांनी केले, सहा ग्रंथपाल पल्लवी तौर मॅडम, क्लार्क विराज पतंगे हे उपस्थित होते.
More Stories
कुस्ती स्पर्धेत अगळगाव येथील लोकसेवा विद्यालयाचे चार विद्यार्थी जिल्हा स्तरावर
बार्शीच्या शहाजी फुरडेंचा व्हिएतनाममध्ये सन्मान, विमा व्यवसायातील MDRT चा विशेष बहुमान
नांदेड-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस’चा नांदेड रेल्वे स्थानकावरून शुभारंभ