Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > कृषी व पशुसंवर्धन > यंदा भैरवनाथ शुगर कारखान्याचे ५ लाख मे. टन गाळपाचे उद्दिष्ट : चेअरमन सावंत

यंदा भैरवनाथ शुगर कारखान्याचे ५ लाख मे. टन गाळपाचे उद्दिष्ट : चेअरमन सावंत

यंदा भैरवनाथ शुगर कारखान्याचे ५ लाख मे. टन गाळपाचे उद्दिष्ट : चेअरमन सावंत
मित्राला शेअर करा

आगामी गाळप हंगामात सोनारी येथील भैरवनाथ शुगर कारखान्याने पाच लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट ठरवले आहे. हंगामाची पूर्वतयारी पूर्ण झाली असून गाळपाच्या उद्दिष्ट पूर्ततेसाठी ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांनी संपूर्ण ऊस कारखान्याकडे गळीतास पाठवून सहकार्य करावे असे आव्हान चेअरमन शिवाजी सावंत यांनी केले.

कारखान्याच्या सन २०२३-२४ च्या १६ व्या गळीत हंगामासाठी कारखान्याने ऊस तोडणी वाहतूक यंत्रणा उभारली असून, त्यांना अ‍ॅडव्हान्स वाटप केल्याचे कारखान्याचे चेअरमन शिवाजी सावंत यांनी केले.

सोनारी येथील भैरवनाथ शुगर वर्क्स कारखान्याच्या १६ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नि प्रदिपन व मोळी पूजन पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली भैरवनाथ शुगर्स समुहाचे चेअरमन शिवाजी सावंत, भैरवनाथ शुगर्स समुहाचे व्हाईस चेअरमन अनिल सावंत, कार्यकारी संचालक तथा जि.प.चे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या हस्ते गुरुवारी (दि.२६) करण्यात आले.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, कारखाना कार्यक्षेत्रातील १३ हजार हेक्टर सभासद व बिगर सभासद ऊसाचे क्षेत्र नोंदविले गेले आहे. ऊस तोडणीच्या दृष्टिकोनातून ३१७ ट्रक, ट्रॅक्टर तर जवळच्या ऊस वाहतुकीसाठी ८० बैलगाड्या कार्यरत राहणार आहेत. ऊस तोडणी प्रोग्राम हा नंबरने व ऊस लागण नोंदीप्रमाणेच राबविला जाईल तसेच कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व सभासद, बिगर सभासद यांचा ऊस गाळप होणार आहे.

विनाकारण ऊस कारखान्यास देण्यासाठी घाई करून तोडणी प्रोग्राम विस्कळीत करू नये, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमास शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता साळुंके, माजी बांधकाम सभापती दत्तात्रय मोहिते, माजी नगराध्यक्ष जाकिर सौदागर, माजी नगराध्यक्ष संजय गाढवे, राष्ट्रवादी परंडा विधानसभा अध्यक्ष नवनाथ जगताप, माजी जिल्हाप्रमुख गौतम लटके, युवासेना तालुकाप्रमुख राहुल डोके, बालाजी गायकवाड, चीफ अकाऊंटंट गोविंद कुलकर्णी, शेती अधिकारी दादा काळे आदी उपस्थित होते.