Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > ताज्या > छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुरेखा गाढवे-चेडे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुरेखा गाढवे-चेडे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुरेखा गाढवे-चेडे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार
मित्राला शेअर करा

वाशी : छत्रपती शिवाजी विद्यालय, वाशीच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुरेखा गाढवे-चेडे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त शाळेच्या वतीने त्यांचा व त्यांचे पती अशोक चेडे यांचा शनिवारी दि. 05 एप्रिल 2025 रोजी सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवर, नातेवाईकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समितीचे अध्यक्ष तानाजी शिनगारे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शीचे सचिव पी. टी. पाटील, सहसचिव अरुण देबडवार, खजिनदार जयकुमार शितोळे, सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. चंद्रकांत मोरे, प्रफुल्ल गाढवे संचालक शिवशक्ती अर्बन बँक बार्शी यांची उपस्थिती होती. यावेळी नगराध्यक्षा विजयाताई गायकवाड, माजी नगराध्यक्ष नितीन चेडे, सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. सूर्यकांत जगदाळे, डॉ. शारदा मोळवणे, प्रभारी प्राचार्य डॉ. अरुण गंभीरे, प्राचार्य सुहास थोरबोले, मुख्याध्यापक दत्तू घुमरे, संतोष माने, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष संदीप कवडे, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष नेताजी नलवडे, पर्यवेक्षक बापूसाहेब सावंत, एस.एल. पवार, एस. के. नलवडे, डी. डी. चौधरी, श्रीमती वैजयंती चव्हाण गटशिक्षण कार्यालय वाशी, यांच्यासह शिक्षक, शिक्षिकेतर कर्मचारी उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमासाठी संस्थेच्या विविध शाखेतील शाखाप्रमुख तसेच शिक्षक प्रतिनिधी, गावकरी व इतर पाहुणे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक बापूसाहेब सावंत यांनी, तर सूत्रसंचालन एस. बी. छबिले, एस.ए स. धारकर यांनी केले. आभार जी. एम. देशमुख यांनी मानले.