सोलापूर येथे स्पेन्का ग्रुपच्या भव्य कॉर्पोरेट कार्यालयाचं उद्घाटन आणि त्यांच्या नाविन्यपूर्ण आयनायझर मशीनचं अनावरण आज सोहळा आज संपन्न झाला.

आजच्या काळात नाविन्य, गुणवत्ता आणि धाडस यांचं समतोल साधणं हे फार कठीण झालं आहे. श्री. सुहास आदमाने आणि स्पेन्का टीमनं हे शक्य करून दाखवलं. या तरुण उद्योजकाने ज्या पद्धतीनं व्यवसायात स्वतःची छाप सोडली आहे, ती खरंच अभिमानास्पद आहे.
उद्घाटनाचा हा क्षण केवळ एक कार्यक्रम नव्हता तर एका पिढीच्या संकल्पशक्तीचा उत्सव होता.

या प्रसंगी आमदार श्री. सचिन कल्याणशेट्टी, आमदार श्री देवेंद्र कोठे, माजी आमदार राजन पाटील, सोलापूर महापालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, शिवसेना जिल्हा प्रमुख प्रा. शिवाजीराव सावंत, उद्योजक श्री. यतीन शाह, शिवचरित्रकार श्री. शिवरत्न शेटे, उद्योजक श्री. अमर देशमुख, सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती श्री. संजय पाटील, श्री मनोज शिंदे, श्री. नितीन गडदे, सौ. रंजिता चिकोटे, स्पेनका समूहाचे श्री. सुहास आदमाने, श्री. दीपक जाधव, श्री. भूषण चिंचोले, श्रीमती तेजल आकोलकर, सौ. अश्विनी आदमाने व सोलापूर शहरातील नागरिक व विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
More Stories
शाकंभरी नवरात्रोत्सवात आकाशात अवतरली भवानी माता; ३०० ड्रोनने साकारला भक्तीचा अद्भुत सोहळा
नव्या वर्षात महिलांसाठी कौशल्यपूर्ण संवाद सक्षमीकरणावर भर देणार – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
लाडोळे मार्गे वैराग ते उपळे रस्त्याची अवस्था दयनीय; ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल