शिकागो मेट्रो रेल्वे प्रकल्पावरून प्रेरित होऊन तयार केली क्रांतिकारी योजना
सोलापूर मेट्रो योजना पॅटर्न सोलापूरच्या एका भूमिपुत्राने सोलापूरच्या विकासाचा एक शतकाचा मोठा टप्पा डोळ्यासमोर ठेवून या शहरासाठी सोलापूर मेट्रो ही क्रांतिकारक योजना तयार केली आहे . मूळचे सोलापूरचे असलेले सुनीलकुमार शिंदे यांनी गेली दोन ते तीन वर्षे या योजनेचा तपशीलवार अभ्यास केला आहे . या योजनेची माहिती त्यांनी मंगळवारी पत्रकारांना ध्वनिचित्रफितींच्या माध्यमातून दिली
श्री . शिंदे हे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातले जागतिक कीर्तीचे तज्ञ असून त्यांचे प्राथमिक व महा . शिक्षण सोलापुरात आणि अभियांत्रिकीचे शिक्षण सांगलीच्या वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नालॉजीतून झालेले आहे व्यवसायाच्या निमित्ताने जगभर फिरताना त्यांना अनेक शहरांचा विकास मेट्रो रेल्वे मुळे कसा झाला हे पहायला मिळाले . त्यामुळे आणि विशेषत : अमेरिकेतल्या शिकागो शहरातल्या मेट्रो सेवेमुळे ते प्रेरित झाले . सोलापूरचा विकास मेट्रोमुळे कसा होईल याचा विचार करताना त्यांना शहरासोबतच लगतचा ग्रामीण भागही मेट्रोला जोडण्याची कल्पना सुचली . त्यातूनच सोलापूर मेट्रो हा वेगळा पॅटर्न त्यांनी तयार केला आहे . या सोलापूर मेट्रोने सोलापूर शहर पंढरपूर अक्कलकोट , तुळजापूर , एनटीपीसी , बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळ , तिऱ्हे , सोरेगाव , ही सात केन्द्रे जोडली जातील .
101 मेट्रो स्थानके आणि सोलापुरातला वर्तुळाकार मुख्य मार्ग अशी ही सोलापूर मेट्रो 220 किलो मीटर्स लांबीची असेल अशी या सोलापूर मेट्रोने सोलापूर शहर पंढरपूर , अक्कलकोट , तुळजापूर , एनटीपीसी , बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळ , तिऱ्हे , सोरेगाव , ही सात केन्द्रे जोडली जातील . 101 मेट्रो स्थानके आणि सोलापुरातला वर्तुळाकार मुख्य मार्ग अशी ही सोलापूर मेट्रो 220 किलो मीटर्स लांबीची असेल अशी माहिती श्री . शिंदे यांनी दिली . या मेट्रोमुळे शहराचा आणि लगतच्या या ग्रामीण भागाचाही विकास होईल असा दावा त्यांनी केला . सोलापूर मेट्रो ही केवळ सोलापूर शहरासाठी नाही . तो एक पॅटर्न आहे आणि जगभरातल्या , सोलापूरसारख्या कोणत्याही बी ग्रेड शहराच्या विकासाला चालना देणारा आहे .
भारत सरकारने 2017 साली मेट्रो नीती जाहीर केली असून मेट्रोमुळे शहराचे अनेक प्रश्न सुटू शकतात हे या मेट्रो नीतीत दाखवून दिले आहे . असे असले तरी भारत सरकार बी ग्रेड शहरांचा समावेश मेट्रो शहरात करीत नाही . म्हणून अशा शहरांना लागू पडेल अशी ही योजना श्री . सुनीलकुमार शिंदे यांनी तयार केली आहे . या ध्वनिचित्रफितीची – संकल्पना – सुनीलकुमार शिंदे आणि टीम यांची होती तर लेखन – अरविंद जोशी सर , संकलन आणि ग्राफिक्स- सचिन जगताप यांनी केले तर ऋतुराज कुलकर्णी यांच्या आवाजाने सुंदर अशी चित्रफित समस्त सोलापूरकरांना दाखविण्यात आली.
More Stories
राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत छत्रपती बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या 11 खेळाडूंचे उज्ज्वल यश
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नवीन नोंदणीसाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद