दिनांक 3 जानेवारी 2025 वार शुक्रवार रोजी बार्शी येथील राज लॉन्स कुर्डूवाडी रोड बार्शी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती निमित्त जिल्हा परिषद सोलापूर प्राथमिक शिक्षण विभाग व पंचायत समिती बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय किशोरी हितगुज मेळावा व बालिका दिन उत्साहात साजरा करण्यात आला
सदर जिल्हास्तरीय मेळाव्याचे नियोजन व व्यवस्थापन माननीय शिक्षणाधिकारी सोलापूर( प्राथमिक )मा. श्री कादर शेख साहेब यांचे मार्गदर्शनाखाली बार्शी तालुक्यातील महिला केंद्रप्रमुख श्रीमती सिंधुताई गिलबिले मॅडम यांच्या नेतृत्वात व बार्शी तालुक्यातील महिला शिक्षकांच्या कार्य समितीच्या सहकार्याने व पंचायत समिती बार्शीचे गटशिक्षणाधिकारी.श्री बालाजी नाटके साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार उत्साहात संपन्न झाला
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुमारी स्नेहल वलगुडे या विद्यार्थिनीची निवड करण्यात आली होती कार्यक्रमाची सुरुवात कार्यक्रमाचे अध्यक्ष कुमारी स्नेहल वलगुडे व माननीय श्रीम.रुपाली भावसार मॅडम (उपशिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सोलापूर) श्रीम.गोदावरी राठोड मॅडम (विस्तार अधिकारी ) या महिला अधिकाऱ्यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली
कार्यक्रमासाठी सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कुलदीप जंगम साहेब,समाज कल्याण अधिकारी श्री सचिन कावले साहेब,उपशिक्षणाधिकारी श्रीम.रुपाली भावसार मॅडम विस्तार अधिकारी श्रीम.गोदावरी राठोड मॅडम विस्तार अधिकारी श्रीम.स्वाती स्वामी मॅडम तसेच गटशिक्षणाधिकारी बार्शी बालाजी नाटके साहेब उपस्थित होते
सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कुलदीप जंगम साहेब यांनी उपस्थित बालिका विद्यार्थिनी व महिलांना बालिका दिनाच्या शुभेच्छा दिल्या स्त्री शिक्षणाचे महत्त्व विद्यार्थी सुरक्षा व शिक्षक मुख्याध्यापक आणि अधिकाऱ्यांचे कर्तव्य याबाबत अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले साहेबांनी समोरील विद्यार्थिनींना चाईल्ड हेल्पलाइन नंबर विचारतात समोर बसलेल्या विद्यार्थिनींनी एका सुरात अचूक नंबर सांगितले त्यावरून आपल्या विद्यार्थिनी किती सजग आहेत हे मुख्याधिकाऱ्यांच्या ही लक्षात आले
जिल्हास्तरीय किशोरी मेळाव्यातील काही ठळक बाबी
१)उपस्थित किशोरींना योग व कराटे याबाबत चांगल्या प्रकारचे प्रशिक्षण देण्यात आले
२)श्रीमती कंटे मॅडम माननीय न्यायाधीश महोदयात बार्शी यांचे अध्यक्षतेखाली विधी सेवेची टीम उपस्थित राहून त्यांनी ही चांगल्या प्रकारे कायदेशीर बाबी सहित विद्यार्थी सुरक्षा संबंधी अचूक मार्गदर्शन केले यामध्ये महिला न्यायाधीश महिला वकील यांनी किशोरी यांच्याशी हितगुज साधले
३)निर्भया पथक बार्शी येथील महिला पोलीस अधिकारी सोनम जगताप यांनी देखील किशोरींचे संवादात्मक पद्धतीने चांगल्या प्रकारे समुपदेशन केले विद्यार्थिनींना चांगल्या प्रकारचे मार्गदर्शन केले आपल्या परिसरातील कोणी विद्यार्थी आपल्याला त्रास देत असेल तर त त्याची तक्रार आपल्याकडे कशा पद्धतीने करावी याचेही मार्गदर्शन केले
४)पोलीस अधिकारी ए पी आय श्री.बाळासाहेब जाधव यांनी पोलीस दलातील विविध प्रकारची GUN व सुरक्षा साधने स्टेजवर मांडून त्यांची व्यवस्थित प्रकारे माहिती सांगितली
५)बार्शी तालुक्यातील शिक्षक व शिक्षिका यांच्या गीतमंच टीमने अतिशय मधुर आवाजात स्वर साधना या कार्यक्रमात प्रस्तुत केली
६)आरोग्य विभागातील महिला डॉक्टर यांनी उपस्थित राहून मुलींचे आरोग्य व शिक्षण यांचे महत्त्व समजावून दिले आरोग्य संबंधीच्या काही मुलींच्या अडचणी असतील तर त्या कोणत्या आहेत हे जाणून घेऊन त्यांना योग्य प्रकारचे मार्गदर्शन करण्याचं काम त्यांनी केलं
७)मेळाव्याला उपस्थित असणाऱ्या किशोरी यांच्या व महिला शिक्षिकांच्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या व माननीय मुख्याधिकारी साहेब यांच्या हस्ते या सर्वांना बक्षीस वितरण करण्यात आलं
८)युनिसेफच्या प्रतिनिधी मार्फत माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांच्या समक्ष विद्यार्थिनींना सुरक्षा मार्गदर्शन करण्यात आले व बालविवाह प्रतिबंधक शपथ ही या मेळाव्यात घेण्यात आली
९)शिक्षण विभागातून उपशिक्षणाधिकारी मा.रुपाली भावसार मॅडम यांनी सर्व किशोरींना अतिशय मोलांचं मार्गदर्शन केलं व सकारात्मक विचार शिक्षणाचे महत्व त्यांनी विद्यार्थिनींना पटवून देऊन आयुष्यात चांगलं व्यक्तिमत्व बनवण्याची प्रेरणा दिली
१०)माननीय विस्तार अधिकारी श्रीम.स्वाती स्वामी मॅडम यांनी त्यांच्या अनुभव पूर्ण व अभ्यासपूर्ण मार्गदर्शनाने सर्व टीमला मार्गदर्शन करून जिल्हास्तरीय मेळाव्यातील एवढे सारे उपक्रम व विविध स्पर्धा चांगल्या प्रकारे राबविण्याचे व्यवस्थापन केले
११)सर्वात विशेष बाब म्हणजे जिल्हास्तरीय मेळावा नियोजन व्यवस्थापनासाठी माननीय शिक्षणाधिकारी साहेबांच्या मार्गदर्शनाने बार्शी तालुक्यातील महिला केंद्रप्रमुख श्रीमती सिंधुताई मॅडम यांच्या नेतृत्वात बार्शी तालुक्यातील महिला शिक्षकांच्या कार्य समित्यांनी मोलाचं सहकार्य केलं त्याचबरोबर शिक्षण विभाग सोलापूर जिल्हा मुख्यालय कडून देखील महिला अधिकारीच मेळाव्याला उपस्थित होत्या
१२) सदर किशोरी मेळाव्यास जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून ७०० किशोरी उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम. कल्पना उकिरडे मॅडमआणि श्रीम. अर्चना घोरपडे मॅडम यांनी तरआभार प्रदर्शन श्री.ज्ञानेश्वर जाधव (केंद्रप्रमुख) यांनी केले
More Stories
वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रमांतर्गत महाविद्यालयांचा उर्त्स्फुत प्रतिसाद
श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी मध्ये रक्त तपासणी शिबीर संपन्न
‘सीसीएमपी’ उत्तीर्ण होमिओपॅथी व्यावसायिकांस ॲलोपॅथी व्यवसाय करण्यास परवानगी