बार्शी : येथील वृक्ष लागवड आणि संवर्धन चळवळीचे आद्य प्रवर्तक वायूपुत्र नारायण बाबा जगदाळे यांच्या जयंतीनिमित्त वृक्ष संवर्धन समितीमार्फत शहरातील दीडशे वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या ऐतिहासिक सार्वजनिक वाचनालयाची स्वच्छता केली.

सर्व स्वच्छता झाल्यानंतर वायूपुत्र बाबांना आदरांजली वाहण्यात आली. या वेळी शशिकांत धोत्रे, विष्णू कांबळे तसेच वाचनालयाचे अध्यक्ष अशोक सावळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी पवनकुमार देशमुख, विक्रम टकले हे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रा. सचिन चव्हाण यांनी केले. प्रास्ताविक वृक्ष संवर्धन समितीचे अध्यक्ष उमेश काळे यांनी केले तर सचिन मस्के यांनी आभार मानले. या स्वच्छता उपक्रमात योगेश गाडे, दीपक जाधव, चंद्रकांत बुगडे, दादा गवळी, उदय पोतदार, मोहम्मद शेख, महेश बकशेट्टी, हमने सर, रतीकांत हामने, अक्षय भुईटे, प्रवीण गटकुळ, आशिष चौधरी, सचिन यादव उपस्थित होते.
More Stories
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले
जी. डी. सी. अँन्ड ए. व सी. एच. एम. परिक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदवाढ
संत गोरोबाकाका मंदिराची प्रस्तावित नवीन कमान महाद्वाराची जागा बदलण्याची तेर ग्रामस्थांची मागणी