जर कोणी चलनात असणारे नाणे घेत नसेल तर त्याच्यावर रीतसर गुन्हा दाखल करू शकतो. आरोपी व्यक्तीविरोधात भारतीय दंड संहितानुसार कारवाई होऊ शकते.

सध्या बाजारात दहा रुपयांची नाणी चालणार नसल्याची अफवा काही ठिकाणी पसरली व त्यामुळे ही नाणी स्वीकारली जात नसल्याचे दिसते या अफवेने काही दुकानदार, छोटे व्यापारी व ग्राहक ही नाणी स्विकारायला टाळाटाळ करतात. त्यामुळे बाजारपेठेत दहाची नाणी चलनातून वापरने जवळपास बंद झाले आहेत.
परंतु चलनातील कोणतीही नाणी बंद झालेली नाहीत किंवा बंदही होणार नाहीत. ही निव्वळ अफवा असून या बाबतीत नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये पाच, दहा रुपयांची नाणी चलनातच राहणार आहेत असा खुलासा राष्ट्रीयकृत बँकांनी केला आहे. दरम्यान या बाबत स्टेट बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही निव्वळ अफवा असून चलनातील कोणतीही नाणी बंद झालेली नाहीत किंवा बंदही होणार नाहीत. या बाबतीत नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये. पाच, दहा रुपयांची नाणी चलनातच राहणार आहेत असे वेळोवेळी स्पष्टीकरण दिले आहे. रिझर्व्ह बँकेने नाणी बंद बाबतीत कोणताही निर्णय घेतला नाही . कोणतेही निर्देश दिलेले नाही.
असे असताना विनाकारण अफवा पसरवून नागरिकांना भयभीत करण्याचा हा प्रकार आहे अर्थिक विषयांच्या बाबतीत अफवा पसरवून लोकांत चुकीची माहिती पसरविणारांवर कठोर कारवाई सुद्धा होऊ शकते.
More Stories
सरकारी कामात अडथळा करणाऱ्या आरोपीला सेशन कोर्ट बार्शी यांनी सुनावली शिक्षा
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले
जी. डी. सी. अँन्ड ए. व सी. एच. एम. परिक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदवाढ