दलित महासंघ आयोजित साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय दलित मित्र गौरव पुरस्कार महाराष्ट्र विद्यालय बार्शी च्या प्राचार्या के.डी.धावणे यांना दिनांक २९ ऑगस्ट २०२४ रोजी यशवंतराव चव्हाण सभागृह बार्शी याठिकाणी सर्व मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.
या कार्यक्रमाचे उद्घाटक प्रा.डॉ. मच्छिंद्र सकटे व कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.आमदार राजेंद्र राऊत हे होते.
यावेळी जयवंत बोधले महाराज, तहसीलदार एफ आर शेख, अप्पर तहसीलदार वृषाली केसकर,पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे, मुख्याधिकारी न पा बार्शी बाळासाहेब चव्हाण, वकील संघ अध्यक्ष काकासाहेब गुंड, डॉ. अजित आव्हाड, नवनाथ चांदणे, श्रीधर कांबळे, प्रकाश मोहिते, अतुल नलगे उपस्थित होते.
या पुरस्काराबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ. श्री. बी. वाय. यादव साहेब, संस्थेचे उपाध्यक्ष माननीय श्री. नंदनजी जगदाळे साहेब,संस्थेचे जनरल सेक्रेटरी तथा शाळा समितीचे अध्यक्ष माननीय श्री.पी. टी.पाटील साहेब, संस्थेचे सहसचिव तथा शाळा समितीचे सदस्य मा.श्री.अरुणजी देबडवार, संस्थेचे खजिनदार माननीय श्री.जयकुमार शितोळे,शाळा समितीचे सदस्य माननीय श्री. व्ही. एस. पाटील, श्री. बी. के. भालके, सर्व संस्था कार्यकरिणी सदस्य, सर्व संस्था सदस्य, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती के.डी.धावणे,उपमुख्याध्यापक श्री. आर. बी. सपताळे पर्यवेक्षक एस. सी. महामुनी, पर्यवेक्षिका एन. बी साठे, सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
More Stories
राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत छत्रपती बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या 11 खेळाडूंचे उज्ज्वल यश
प्रा. राहुल पालके यांना सोलापूर विद्यापीठाकडून विद्यावाचस्पती ( पी.एच.डी.) प्रदान
बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सूचना: केवायसी प्रक्रिया तातडीने करा!