दौंड तालुक्यातील उजनी धरणाच्या बॅकवॉटर क्षेत्रात बुडित बंधारे बांधण्यासाठी सुधारित धोरण ठरविण्याबाबत समिती स्थापन करण्यात येणार आहे.

समितीच्या अहवालानंतर धोरण निश्चित करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातील बैठकीत सांगितले. यावेळी आमदार राहुल कुल, आमदार जयकुमार गोरे, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता यांच्यासह दौंड तालुक्यातील विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
More Stories
शाकंभरी नवरात्रोत्सवात आकाशात अवतरली भवानी माता; ३०० ड्रोनने साकारला भक्तीचा अद्भुत सोहळा
नव्या वर्षात महिलांसाठी कौशल्यपूर्ण संवाद सक्षमीकरणावर भर देणार – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
लाडोळे मार्गे वैराग ते उपळे रस्त्याची अवस्था दयनीय; ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल