Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > सोलापूर/उस्मानाबाद > DCC-शिवाजीनगर,बार्शी शाखेस अभिनव माध्य.व उच्च माध्य. विद्यालय, बार्शी प्रशालेकडून “२६ व्या वर्धापन दिनाच्या” शुभेच्छा

DCC-शिवाजीनगर,बार्शी शाखेस अभिनव माध्य.व उच्च माध्य. विद्यालय, बार्शी प्रशालेकडून “२६ व्या वर्धापन दिनाच्या” शुभेच्छा

मित्राला शेअर करा

अभिनव माध्य.व उच्च माध्य.विद्यालय,बार्शी प्रशालेकडून DCC-शिवाजीनगर,बार्शी शाखेस २९/११ रोजी चांगल्या सेवेबद्दल “२६ व्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या.सोलापूर.शाखा – शिवाजीनगर,बार्शी.शाखेच्या वर्धापण दिनानिमित्त यशोदा शिक्षण प्रसारक मंडळ,बार्शी संचलित अभिनव माध्य.व उच्च माध्य.विद्यालय,बार्शी. प्रशालेकडून शाखाधिकारी श्री. रामेश्वर चकोर व सर्व कर्मचारी वृंद यांना शुभेच्छा देऊन चांगल्या सेवेबद्दल सत्कार करण्यात आला.


प्रसंगी उपस्थित प्रशाला प्राचार्य श्री.व्हि.डी.क्षीरसागर-सर, तालूका बैंक निरीक्षक श्री.राजेश उंबरदंड, प्रशालेचे शिक्षक,कर्मचारी वृंद, बैंकेचे सर्व कर्मचारी वृंद, बॅंकेचे हितचिंतक उपस्थित होते.


याप्रसंगी अभिनव प्रशालेचे श्री.राजू अंबोरे-सर यांचा बॅंकेने पगारी सभासद कर्मचारी वीमा तात्काळ उतरवून दिला.


शिवाजीनगर,बार्शी शाखेकडून आम्हा सर्व सभासदांना मिळणारी सर्व प्रकारची सेवा ही अतिशय जलद व विनम्र आहे; याबद्दल अभिनव प्रशालेचे श्री.संतोष घावटे-सर यांनी बॅंक शाखाधिकारी व सर्व कर्मचारी वर्गाचे आभार मानले.