शिवसेनेची परंपरा असणाऱ्या शिवाजी पार्कवर होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी धाराशिव जिल्हा शिवसेनेच्यावतीने धाराशिव लोकसभा मतदार संघातील शिवसैनीकांसाठी ” तुळजाभवानी एक्सप्रेस क्र. ००१८० रेल्वेचे आयोजन केलेले असून उद्या दि. ०४/१०/२०२२ रोजी रात्री ठिक १.०० वाजता धाराशिव मतदार संघातील शिवसेनीकांनी रेल्वे स्टेशन, धाराशिव येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन खा. श्री ओमप्रकाशराजेनिंबाळकर, जिल्हाप्रमुख तथा आमदार श्री . कैलास घाडगे पाटील , नगराध्यक्ष श्री. मकरंद उर्फ नंदु भैय्या राजेनिंबाळकर आणि जिल्हा शिवसेनेच्या वतीने करण्यात आलेले आहे.
धाराशिव जिल्हा शिवसेनेच्या वतीने मागणी केल्यानुसार रेल्वेच्या पुष्ठी मंजुरीचे पत्र मध्य रेल्वेचे A.T.M. (COG) ब्रजेश रॉय यांनी कळवल्याचे जिल्हा शिवसेनेच्या वतीने सांगण्यात आलेले आहे. गेल्या काही दिवसांपुर्वी घडलेल्या राजकीय गदारोळांपासून राज्यातील असंख्य निष्ठावान शिवसेनांसह राज्यातील नागरीकांना दसरा मेळाव्याची प्रतिक्षा लागली असून पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांचे विचार आत्मसात करण्यासाठी राज्यातील शिवसैनीक आणि नागरीक उत्सुक आहेत.
शिवसैनिकांची अस्मिता असणारा दसरा मेळावा शिवातीर्थवरच होणार असून शिवसेनेची दसरा मेळाव्याची परंपरा अखंडीत सुरु राहणार असून हा दसरा मेळावा खऱ्या अर्थाने स्वाभिमान, निष्ठा , संघर्ष आणि त्यागाचे प्रतिक असल्याचे सांगून या दसरा मेळाव्यासाठी धाराशिव लोकसभा मतदार संघातील जास्तीत जास्त नागरीकांनी पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांचे विचार ऐकण्यासाठी येण्याचे आवाहन खा. राजेनिंबाळकर यांनी केलेले आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा ही आपली वैचारीक परंपरा असून पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या ज्वलंत धगधगत्या विचारांची शिदोरी घेण्यासाठी मोठ्या संख्येने येण्याचे आवाहन खा. श्री. राजेनिंबाळकर, आमदार श्री. घाडगे – पाटील, जिल्हाप्रमुख श्री. गौतम लटके, नगराध्यक्ष श्री. नंदु राजेनिंबाळकर यांनी केलेले आहे.
More Stories
राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत छत्रपती बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या 11 खेळाडूंचे उज्ज्वल यश
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नवीन नोंदणीसाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद