तेजस्वी फौंडेशन संचलित सुर्योदय वृध्दाश्रम, बेघर,निराधार, निराश्रीत, काही कारणाने वृध्दाश्रमात यावे लागणार्यांसाठी सुरू केलेले सुर्योदय वृध्दाश्रम आजच्या परिस्थितीमध्ये नाईलाजाने का होईना पण वृध्दाश्रमाची आवश्यकता आहे.म्हणूनच हा प्रकल्प सुरू झालेला आहे.

सुर्योदय वृध्दाश्रमात गरजू वृध्दांना मोफत,अल्पदरात सांभाळले जाते एवढेच नाही तर त्यांची अगदी आपण आपल्या घरीच आहोत अश्या पद्धतीने काळजी घेतली जाते. या ठिकाणी काउसलिंग सेंटर, डे केअर सेंटर सुरू केले आहे.तसेच पुणे जिल्हा न्यायालय व तेजस्वी फौंडेशन मार्गदर्शनाने वृध्दांना व महीलांना कायदेशीर सल्ला,मदत, मार्गदर्शन केले जाते,
नव्याने सुरू झालेल्या वृध्दाश्रमात 4 आजींना हक्काच निवारा मिळाला आहे. अशा स्तुत्य, कौतुकास्पद उपक्रमास सदिच्छा भेट देवून शुभेच्छा आणि गरज पडेल तिथे मदत, पाठबळे देण्याचे आश्वासन दिले आहे.
यावेळी सुर्योदय वृध्दाश्रमाच्या संचालक छाया भगत व शिवसैनिक संतोषदादा शेलार जिल्हास्तरीय समाजकल्याण दक्षता समिती सदस्य महाराष्ट्र शासन तसेच राधा लाटे, सुचेता संकपाळ,सचिन वायदंडे, उपस्थित होते
आमदार दानवे साहेबांनी सर्वांना आवाहन केले. गरजू जेष्ठा़साठी संघर्षातून सुरू केलेल्या सुर्योदय वृध्दाश्रमास भेट द्या मदतीचे पाठबळ द्या.गरजू ज्येष्ठांचा आधार बनूयात.
सुर्योदय वृध्दाश्रम, गुरू कृपा बिल्डींग पहीला मजला बिकानेर स्विट जवळ DSK रोड, धायरी, पुणे संपर्क 9921912727/ 9881899732
More Stories
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले
धाराशिवला भव्य बसपोर्ट उभारण्यासाठी कार्यवाही करा -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
जी. डी. सी. अँन्ड ए. व सी. एच. एम. परिक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदवाढ