खालील लिंकवरून डाऊनलोड करा प्रश्नसंच
किंवा https://www.maa.ac.in/index.php?tcf=prashnpedhi2021-22
मागील दोन वर्षात ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा लिहिण्याचा सराव कमी झाला आहे. रिकाम्या जागा भरा, लघुत्तरी प्रश्न, दीर्घोत्तरी प्रश्न आदींच्या माध्यमातून परिक्षेचे स्वरूप कसे असेल हे विद्यार्थ्यांना लक्षात यावे, प्रश्नपत्रिका सोडविण्याच्या सरावाबरोबरच त्यांचा आत्मविश्वास वाढावा यादृष्टीने प्रश्नपेढी तयार करण्याची मागणी पालक संघटनांकडूनही सातत्याने होत होती. या पार्श्वभूमीवर प्रश्नपेढी विकसित करण्याचा हा निर्णय घेण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांवरील मानसिक ओझे कमी व्हावे यासाठी यावर्षी अभ्यासक्रम कमी करण्याबरोबरच परीक्षेची वेळ वाढवून देण्याचा निर्णयही मंडळामार्फत घेण्यात आला आहे.
परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयांचा सराव, स्वयंअध्ययनासाठी या प्रश्नपेढ्यांची मदत होईल आणि परीक्षेला जाण्यापूर्वी त्यांचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल, या हेतूने हे प्रश्नसंच तयार केले जात आहेत. या www.maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे प्रा.गायकवाड यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांस तज्ज्ञांकडून समुपदेशन
इ १० वी , इ १२ वीच्या परीक्षार्थीना समुपदेशकांची साथ राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद , महाराष्ट्र तर्फे ४० ९ प्रशिक्षित व प्रमाणित मार्गदर्शक आणि समुपदेशकांची सल्ला व मार्गदर्शन सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे . या सुविधांबाबतची इत्यंभूत माहिती , प्रशिक्षित मार्गदर्शक व समुपदेशकांची यादी https://maa.ac.in/index.php?tcf=counselors_list
या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या सुविधेचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा.
राज्य मंडळाच्या इ . १० वी आणि इ . १२ वीच्या परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा ! या परीक्षेला सामोरे जाताना विद्यार्थ्यांना ताणतणावापासून दूर राहता यावे, ते मानसिकदृष्ट्या अधिक सक्षम व्हावे, यासाठी त्यांचे मार्गदर्शन व समुपदेशन करण्यात येईल.
More Stories
वृक्ष संवर्धन समिती बार्शी च्या “वृक्ष संवर्धन दिनदर्शिका २०२५” चा प्रकाशन सोहळा संपन्न
विधानसभा तालिका सभाध्यक्षांची नियुक्ती जाहीर
राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत छत्रपती बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या 11 खेळाडूंचे उज्ज्वल यश