
आज दिनांक दहा नोव्हेंबर 2022 रोजी इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी मधील शिष्यवृत्ती पात्र 75 विद्यार्थी तसेच त्यांना मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षक, शिक्षिका बांधवांचा सत्कार संस्थेचे आदरणीय सचिव माननीय पी. टी. पाटील साहेब यांच्या हस्ते करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री सपताळे आर. बी. यांनी प्रास्ताविक केले तसेच विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी आपले मनोगते व्यक्त केलीआणि कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय पाटील साहेबांनी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना त्यांच्या गुणवत्तेबद्दल गुलाब पुष्प देऊन सत्कार केला तसेच विद्यार्थ्यांना मिळालेल्या यशाबद्दल बहुमोल असे मार्गदर्शन केले.
त्यानंतर माननीय मुख्याध्यापक चव्हाण सर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे. शिक्षकांचे व अध्यक्षांचे आभार मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उत्कृष्ट सूत्रसंचालन श्री कसबे सर यांनी केले.
More Stories
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले
जी. डी. सी. अँन्ड ए. व सी. एच. एम. परिक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदवाढ
संत गोरोबाकाका मंदिराची प्रस्तावित नवीन कमान महाद्वाराची जागा बदलण्याची तेर ग्रामस्थांची मागणी