बार्शी : सोलापूर जिल्हा चेस असोसिएशनच्या वतीने आयोजित केलेल्या खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत बार्शीच्या प्रसन्न विद्याधर जगदाळे याने जिल्ह्यात पाचवा तर तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवत यश संपादन केले. पंधरा वर्षे वयोगटात बार्शीच्या सान्वी गोरे हिने हे प्रथम क्रमांक मिळवला. याच वयोगटात अनन्या उलभगत ही तिसरी आली.

दहा वर्षा खालील वयोगटात नोमन करमाळकर या विद्यार्थ्याने दुसरा क्रमांक मिळविला. सोलापुरातील टाकळीकर मंगल कार्यालय येथे झालेल्या या स्पर्धेत दहा वर्ष, पंधरा वर्षे वयोगटातील सामन्यासह खुल्या गटातील बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन केले होते.
प्रसन्न जगदाळे याने अंतिम सामन्यात ७ पैकी ५.५ गुण मिळवत हे उज्वल यश मिळवले. या विद्यार्थ्यांना बार्शीच्या नितीन अग्रवाल यांच्यासह सोलापूरच्या सुमुख गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले.
More Stories
रत्न आभूषण उद्योगात महिला उद्योजकांना येण्यास प्रोत्साहन द्यावे : राज्यपाल रमेश बैस
हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त भव्य जुलूस
1 व 2 ऑक्टोबर रोजीशासकीय ITI विद्यार्थ्यांची गड-किल्ले व परिसर स्वच्छता मोहीम : मंत्री मंगल प्रभात लोढा