Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > कृषी व पशुसंवर्धन > जिल्हाधिकारी बार्शीत; ग्रीनफिल्ड कॉरिडोर प्रकल्प पर्यावरण आघात विषयक बैठकीचे नियोजन, शेतकर्‍यांना उपस्थित रहाण्याचे आवाहन

जिल्हाधिकारी बार्शीत; ग्रीनफिल्ड कॉरिडोर प्रकल्प पर्यावरण आघात विषयक बैठकीचे नियोजन, शेतकर्‍यांना उपस्थित रहाण्याचे आवाहन

जिल्हाधिकारी बार्शीत; ग्रीनफिल्ड कॉरिडोर प्रकल्प पर्यावरण आघात विषयक बैठकीचे नियोजन, शेतकर्‍यांना उपस्थित रहाण्याचे आवाहन
मित्राला शेअर करा

गुरुवार दिनांक- 11/8/2022 वेळ दुपारी 3:00 वाजता स्थळ- तहसिल कार्यालय , बार्शी या ठिकाणी मा. जिल्हाधिकारी सोलापूर यांचे अध्यक्षतेखाली भारतमाला परियोजना ( लॉट क्र .5 / पॅकेज 2 ) अंतर्गत अहमदनगर – सोलापूर- अक्कलकोट ग्रीनफिल्ड कॉरिडोर प्रकल्प पर्यावरण आघात विषयक बाबत बैठकीचे नियोजन करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी सोलापूर यांचे अध्यक्षतेखाली भारतमाला परियोजना ( लॉट क्र .5 / पॅकेज 2 ) अंतर्गत अहमदनगर – सोलापूर- अक्कलकोट ग्रीनफिल्ड कॉरिडोर प्रकल्प हा बार्शी तालुक्यामधील 15 गावांमधून जाणार आहे. सदरचा प्रकल्प नव्याने होत असून यामध्ये बाधित शेतकरी यांच्या जमीनी संपादीत होणार असून बाधित शेतकरी यांच्या पर्यावरण आघात विषयक असलेल्या समस्या सोडविण्याकामी मा. जिल्हाधिकारी सोलापूर यांचे अध्यक्षतेखाली बैठक आयोजित केलेली आहे. तरी नागोबाचीवाडी / लक्षाचीवाडी / अलिपूर / कासारवाडी / बळेवाडी / कव्हे दाडशिंगे / पानगाव / काळेगाव / मानेगाव / वैराग / सासुरे / सर्जापूर / राजंजन / हिंगणी ( रा ) या गावातील बाधित होणा – या गावांमधील बाधित शेतकरी यांना उपस्थित राहणे गरजेचे आहे.

साध्या या योजनेमुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या मानत अनेक शंका व संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. यात मुख्य म्हणजे जमिनीचा मिळणारा ( मावेजा ) मोबदला. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी या बैठकीसाठी उपस्थितीत राहू आपल्या शंकांचे निरसन करून घ्यावे.