दिवाळीच्या उत्सवासाठी राज्य सरकारकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे.अवघ्या काही दिवसांवर दिवाळीचा सण आला आहे. या पार्श्वभूमीवर संभाव्य गर्दी किंवा गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता राज्य सरकारकडून खबरदारी घेण्यात येत आहे.
एकीकडे दुसरी लाट ओसरत असताना करोनाची रुग्णसंख्या नियंत्रणात आल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे लसीकरण देखील व्यापक प्रमाणावर सुरू असल्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत.
कोरोना झालेल्या आणि होऊन गेलेल्या नागरिकांना फटाक्यांच्या धुरामुळे त्रास होण्याची भीती आहे. त्यामुळे चालू वर्षी फटाके फोडणे टाळावे -त्याऐवजी दिव्याची आरास करून उत्सव साजरा करावे. -राज्यातील धार्मिक स्थळ खुली केली असली तरी दिवाळी उत्सव घरगुती स्वरूपात मर्यादेत राहील याची दक्षता घ्यावी. -खरेदीसाठी गर्दी टाळावी
ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांनी घराबाहेर जाणे टाळावे. -दिवाळी पहाट कार्यक्रम कोविड १९ संसर्ग प्रतिबंधात्मक नियमानुसार होतील.
काय आहेत नियम?
१. राज्यातली धार्मिक स्थळे पुन्हा खुली करण्यात आली आहेत. मात्र, तरीदेखील दिपावलीचा उत्सव घरगुती स्वरुपात मर्यादित राहील, याची दक्षता घेतली जावी.
२. दिपावलीच्या काळाच खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी होत असते. मात्र, नागरिकांनी गर्दी टाळावी. विशेषत: ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांनी बाहेर पडणे टाळावे. ३. मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग आणि करोनाच्या इतर नियमांचं तंतोतंत पालन करावं. ४. दिपावलीच्या उत्सवादरम्यान मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतिषबाजी केली जाते. त्यामुळे वायू आणि ध्वनीप्रदूषणाची पातळी वाढून लोकांच्या आणि प्राण्यांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतात. करोना झालेल्या किंवा होऊन गेलेल्या नागरिकांना फटाक्यांच्या धुरामुळे त्रास होण्याची भिती आहे. त्यामुळे नागरिकांनी फटाके फोडण्याचं टाळून दिव्यांची आरास करून उत्सव साजरा करावा.
५. दिवाळी पहाटसारख्या कार्यक्रमांना परवानगी देतानाच त्यासाठी आवश्यत ती नियमावली देण्यात आली आहे. या नियमावलीचं काटेकोर पालन होईल, याची दक्षता घेण्यात यावी. शक्यतो असे कार्यक्रम ऑनलाईन, केबल नेटवर्क किंवा फेसबुक लाईव्ह अशा माध्यमातून करण्यात यावेत.
६. सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्यविषयक उपक्रम/रक्तदान शिबिरे आयोजित करून त्यातून करोना, मलेरिया, डेंग्यू आदी आजारांचे प्रतिबंधात्मक उपाय आणि स्वच्छतेविषयी जनजागृती करावी.
More Stories
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नवीन नोंदणीसाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
‘उत्सव निवडणुकीचा, अभिमान महाराष्ट्राचा’ या मतदान जनजागृतीचा उद्या राज्यस्तरीय शुभांरभ