नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी व डॉक्टरांनी उत्कृष्ट व जलद सेवा द्यावी – मा आ राजन पाटील
डॉ. अभय आबासाहेब शिंदे यांचे अदिती डायग्नोस्टिक सेंटरचा शुभारंभ मा आ राजन पाटील यांच्या हस्ते पार पडला.

यावेळी राजन पाटील आपल्या शुभेच्छा भाषणातून ते म्हणाले की, करोनो आणखी पूर्णतः संपलेला नसून नागरिकांनी स्वतःची व आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्यावी. तसेच डॉक्टरांनी आपल्याकडे येणाऱ्या रुग्णांना उत्कृष्ट व जलद सेवा द्यावी. मोहोळ सारख्या ठिकाणी डायग्नोस्टिक सेंटर चालू करून आसपासच्या रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे रुग्णांचे पैसे आणि वेळ वाचून उपचार वेळेत होतील असे म्हणत राजन पाटील यांनी डॉक्टर शिंदे परिवाराला शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी ऍड. अनिल पाटील, डॉ सुधीर शिंदे, माजी सभापती विनायक विधाते, रमेश कोंढारे, भारत नलगे, शामराव काकडे, माजी सभापती विद्याताई शिंदे तसेच मोहोळ तालुक्यातील विविध तज्ञ डॉक्टर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना ऍड अनिल पाटील यांनी केली तर उपस्थितांचे आभार डॉ अमोल शिंदे यांनी मानले.
More Stories
सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी ‘मित्र’ संस्थेचे बहुपर्यायी उपक्रम उजनी पर्यटन केंद्र, आयटी पार्क, डाळिंब क्लस्टर, शेंगाचटणी ब्रँडला चालना देण्यावर भर
इक्विटास स्मॉल फायनान्स बँक बार्शी शाखेच्या वतीने महाराष्ट्र विद्यालयात गणेश उत्सवानिमित्ताने रंगभरण स्पर्धा संपन्न
कुस्ती स्पर्धेत अगळगाव येथील लोकसेवा विद्यालयाचे चार विद्यार्थी जिल्हा स्तरावर