Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > ताज्या > डॉ. प्रविण मस्तुद यांच्या “मराठी भाषिक व्यंगचित्र पत्रकारितेचा इतिहास” या पुस्तकास चक्रधर स्वामी राज्यस्तरीय वाङ्‌मय पुरस्कार

डॉ. प्रविण मस्तुद यांच्या “मराठी भाषिक व्यंगचित्र पत्रकारितेचा इतिहास” या पुस्तकास चक्रधर स्वामी राज्यस्तरीय वाङ्‌मय पुरस्कार

डॉ. प्रविण मस्तुद यांच्या "मराठी भाषिक व्यंगचित्र पत्रकारितेचा इतिहास" या पुस्तकास चक्रधर स्वामी राज्यस्तरीय वाङ्‌मय पुरस्कार
मित्राला शेअर करा

बार्शी : डॉ. प्रविण सुरेखा मच्छिंद्र मस्तुद लिखित “मराठी भाषिक व्यंगचित्र पत्रकरिता इतिहास” या पुस्तकास हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील शेवाळा येथील श्री. चक्रधर स्वामी राज्यस्तरीय वाङ्‌मय पुरस्कार २०२५ नुकताच जाहीर झाला आहे. लवकरच एका विशेष कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण केले जाणार असल्याचे पुरस्कार समितीचे अध्यक्ष अनिल कपाटे यांनी सांगितले.

या पुस्तकाला आतापर्यंतचा हा तिसरा पुरस्कार आहे. यावर्षी पुरस्कार प्राप्त प्रतिभावंतांमध्ये इतिहास संशोधन: मराठी भाषिक व्यंगचित्र पत्रकारितेचा इतिहास ( पुस्तक मार्केट पब्लिकेशन, पुणे ) डॉ. प्रविण मच्छिंद्र सुरेखा मस्तुद – बार्शी, कादंबरी : गुंतवळ ( दिलीपराज प्रकाशन, पुणे) अलका मोकाशी – नागपूर, कथासंग्रह : दुभंग ( उत्कर्ष प्रकाशन, पुणे) सर्वोत्तम सताळकर – कलबुर्गी गुलबर्गा , ललित: कपाळ गोंदण (डिंपल पब्लिकेशन, मुंबई ) निशा डांगे – पुसद, आत्मचरित्र : जागरण ( मांजरा प्रकाशन,लातुर ) भारत सातपुते – लातुर , अनुभव कथन: ब्युटी ऑफ लाईफ ( न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस, पुणे) आशा नेगी – पुणे हे आहेत.

मराठी भाषेतला व्यंगचित्र पत्रकारितेचा इतिहास एकत्रित रूपाने उपलब्ध नव्हता तो या पुस्तकातून वाचकांसाठी उपलब्ध झाला आहे. व्यंगचित्र पत्रकारिता क्षेत्रातील हे निराळे व अभ्यासपूर्ण पुस्तक आहे. या पुस्तकाला पुआहो सोलापूर विद्यापीठाचे पत्रकारिता विभागाचे विभागप्रमुख प्रा.डॉ. रवींद्र चिंचोलकर यांची प्रस्तावना तर मलपृष्ठावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे पत्रकारिता विभागाचे प्रा. सुरेश पुरी यांचा शुभेच्छा संदेश आहे.

शेवाळा येथील श्री चक्रधर स्वामी सार्वजनिक वाचनालयाच्या माध्यमातून मराठी वाङ्मय क्षेत्रामध्ये मानाचा असलेला राज्यस्तरीय श्री चक्रधर स्वामी वाड्मय पुरस्कार दिला जातो. यावर्षी या पुरस्काराचे हे २४ वे वर्ष आहे. यावर्षी या पुरस्कारसाठी १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च या कालावधीतील प्रकाशित झालेली सर्वच वाङ्मय प्रकारातील ग्रंथ आमंत्रित करण्यात आली होती. श्री चक्रधर स्वामी साहित्य पुरस्कार समितीचे संयोजक अध्यक्ष अनिल मनोहर कपाटे शेवाळकर, गोविंद आराध्ये, यशवंत जामोदकर, सागर कपाटे यांनी जाहीर केले आहे. यावेळी पुरस्कार पुस्तक परिक्षण समितीमध्ये अनिल शेवाळकर, प्रा. रमेश वाघमारे, प्रा. स्वाती कान्हेगावकर, डॉ. काळे, इंजि. सागर कपाटे, देवानंद मुंढे, वैभव वानखेडे, यशवंत जामोदकर, संतोष वानखेडे, उत्तमराव सूर्यवंशी यांनी काम पाहिले आहे.

पुस्तकाला पुरस्कार मिळल्या बद्दल बार्शी शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन प्रभाताई झाडबुके तसेच खजिनदार वर्षाताई ठोंबरे – झाडबुके श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोज गादेकर, संशोधक मार्गदर्शक डॉ. जगन्नाथ पाटील, प्रा. डॉ. सुहास कुलकर्णी, विचारवंत लेखक प्रा. तानाजी ठोंबरे, ए.बी. कुलकर्णी, आई सुरेखा मस्तुद, पुस्तक मार्केटचे डॉ. मिलिंद कसबे, भारत इतिहास संशोधन मंडळाचे राजेश जाधव, कार्टूनिस्ट कम्बाईन महाराष्ट्र राज्य या संस्थेचे व मार्मिकचे मुखपृष्ठकार गौरव सर्जेराव व धनराज गरड तसेच महाराष्ट्रातील व्यंगचित्रकारांनी तसेच उमेश मदने, अरिफ बागवान, मिलिंद गाढवे आदी मित्रांनी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.