दिनांक 3/01/2025 वार शुक्रवार रोजी नगरपालिका शिक्षण मंडळ ,बार्शी यांच्यावतीने” क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले “यांच्या जयंतीनिमित्त आयोजित गुणवंत शिक्षक आणि उपक्रमशील शाळा या पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बार्शी नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक मा. श्री. बाळासाहेब चव्हाण साहेब प्रमुख पाहुणे म्हणून बार्शीतील विधीज्ञ मा.श्री. प्रशांतजी शेटे साहेब,नगरपालिका शिक्षण मंडळाचे माजी परिवेक्षक मा. श्री. संजय पाटील साहेब तसेच शिक्षण मंडळाचे प्रभारी परिवेक्षक मा. श्री. सुरेश शिंदे सर, बार्शी जनता टाइम्सचे मा. श्री.संतोष सूर्यवंशी उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दत्त प्राथमिक विद्यामंदिर बार्शी या आमच्या शाळेस उपक्रमशील शाळा हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले सदर शाळेत खूप खालच्या स्तरातून विध्यार्थी येत असून देखील नाविन्यपूर्ण विविध उपक्रम राबवून शाळेतील सर्व शिक्षक बंधू भगिनी शिक्षणाची गंगा त्यांच्या दारापर्यंत पोहोचविण्याचे काम खूप प्रामाणिकपणे व तळमळीने करत असल्याने सदर पुरस्कार देण्यात आला सदर पुरस्कार स्विकारताना शाळेतील मुख्याध्यापक श्री.श्रीकांत कुंभारे सहशिक्षक, शिक्षिका श्रीम.संगीता काळे, श्रीम.अरुणा मठपती, श्री.सुनिल लंगोटे, कवी श्री.युवराज जगताप, श्री.मंगेश मोरे,श्रीम.ललिता चव्हाण उपस्थित होते शाळेस मिळालेल्या पुरस्काराबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. मोहन (अण्णा)ठोंगे सर यांनी सर्वांचे कौतुक व अभिनंदन केले
More Stories
सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त भव्य रक्तदान व आरोग्य शिबीराचे आयोजन
उपळकर यांना जोतिबा सावित्री गुणवंत पुरस्कार प्रदान
जिल्हाधिकारी आशीर्वाद यांच्याकडून श्री सिद्धेश्वर महायात्रा 2025 च्या कामांचा आढावा