Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > सोलापूर/उस्मानाबाद > एलिमेंटरी इंटरमिजिएट परीक्षा निकाल जाहीर

एलिमेंटरी इंटरमिजिएट परीक्षा निकाल जाहीर

एलिमेंटरी इंटरमिजिएट परीक्षा निकाल जाहीर
मित्राला शेअर करा

बरेच दिवस झाले दहावीचे विद्यार्थी सवलतीच्या गुणांसाठी आवश्यक असणार्‍या ग्रेड परीक्षांचा निकाल कला संचालनालयाच्या वतीने (शासकीय रेखाकला) एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षेचा ऑनलाईन पध्दतीने जाहीर झाला आहे. या परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी उत्तीर्ण होणाऱ्यांमध्ये एलिमेंटरी ९५.९७ टक्के तर इंटरमिजिएट ९५.३७ टक्के इतका निकाल लागला आहे. हा राज्यस्तरीय निकाल असून जिल्हानिहाय निकाल इंटरमिजिएटचा (दि. १६) रोजी दुपारी ३ वा. तर १९ रोजी एलिमेंटरीचा जाहीर होईल. त्यानंतर विद्यार्थ्यांना ऑनलाईन पध्दतीने निकाल पाहता येईल व प्रिंट ही काढता येणार आहे. परीक्षेचा निकाल व गुणवत्ता यादी

https://dge.doamh.in/

या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येणार आहे.

कला संचालनालयाच्या वतीने २८ सप्टेंबर ते १ ऑक्टांबर २०२२ कालावधीमध्ये रेखाकला परीक्षेचे आयोजन केले होते. सोलापूर जिल्ह्यातून शासकीय रेखाकला परिक्षेला एकुण २१ हजार ८२५ विद्यार्थी बसले होते.

विद्यार्थ्यांना निकालपत्रात किंवा ऑनलाईन व नोंदणी करताना विद्यार्थ्यांच्या नावामध्ये त्रुटी असल्यास नावातील त्रुटींची दुरुस्ती करीता ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे.

राज्यात एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षासाठी सन २०२२ या वर्षी एकुण ६ लाख ६६ हजार४२८ विद्यार्थ्यांची नावे नोंदणी करण्यात आली. त्यापैकी एलिमेंटरी परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ४ लाख ५९ हजार ९९५ एवढी होती. त्यामध्ये ४ लाख ४१ हजार ४८५ हजार विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहे. एकुण ९५.९७ टक्के निकाल लागला आहे. इंटरमिजिएट परिक्षेसाठी प्रत्यक्षात १ लाख ८० हजार ४५८ बसले, त्यापैकी १ लाख ७२ हजार ११७ उत्तीर्ण झाले असून ९५.३७ टक्के निकाल लागला आहे.

शाळांना तीन वेळा काढता येणार प्रमाणपत्र

इंटरमिजिएटचा ड्रॉईंग ग्रेड परीक्षेचा निकाल १६ जानेवारी तर एलिमेंटरी ड्रॉईंग ग्रेड परीक्षेचा निकाल दुपारी ३ वा लागणार आहे. प्रमाणपत्र व दुय्यम निकालपत्रासाठी सहभागी शाळेना लॉगइनवरुन दोन वेळा डाऊनलोड करता येईल. केंद्रांना तीन वेळा डाऊनलोड करता येईल. प्रमाणपत्र डाऊन् लोड करण्यासाठी अंतीम दिनांक ३१ जानेवारी असेल. निकाल पडताळणी व प्रमाणपत्र दुरस्ती करण्यासाठी ३१ जानेवारीपर्यंत ऑनलाईन पध्दतीने केंद्र प्रमुखांच्या लाॅगईनवरुन अर्ज करता येणार आहे.