बँकिंग क्षेत्रात काम करणाऱ्या नामांकित इक्विटास स्मॉल फायनान्स बँक बार्शी शाखेच्या वतीने महाराष्ट्र राज्याचा राज्य उत्सव गणेश उत्सवाच्या निमित्ताने दिनांक 20/8/2025 रोजी महाराष्ट्र विद्यालय, बार्शी येथे रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते.

या रंगभरण स्पर्धेत इयत्ता पाचवी ते सातवीच्या वर्गातील खूप मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना बँकेच्या वतीने रंगसाहित्य व रंगपेटी उपल्ब्ध करून देण्यात आल्या.
या रंगभरण स्पर्धेत एकूण आठ क्रमांक काढण्यात आले व विजेत्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी, प्रमाणपत्र व रंगसाहित्य भेट देण्यात आले.तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. या बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी विद्यालयाच्या प्राचार्या मा.श्रीमती के. डी. धावणे मॅडम, उपमुख्याध्यापक श्री. आर. बी. सपताळे सर, पर्यवेक्षक एस. सी. महामुनी सर, पर्यवेक्षिका श्रीमती एन. बी. साठे मॅडम, ज्येष्ठ शिक्षक के.जी.मदने सर, ब्रँच मॅनेजर श्री. प्रदीप पाटील साहेब, श्री. संतोष गुरव, श्री. गुणवंत बंडगर, श्री. दिनेश मोराळे, श्री. किरण जगताप, श्री. प्रवीण माशाळकर, कला शिक्षक श्री. एन. ए. मोहिते सर, क्रीडा शिक्षक श्री. पी. डी. पाटील सर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच इक्विटास स्मॉल फायनान्स बँक बार्शी शाखेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून शिक्षक दिनाच्या निमित्ताने इक्विटास स्मॉल फायनान्स बँक बार्शी शाखेच्या वतीने महाराष्ट्र विद्यालयातील शिक्षकांना पेन भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

Equitas Small Finance Bank Barshi Branch
यांच्या वतीने आयोजित महाराष्ट्राचा राज्य उत्सव गणेशोत्सव 2025 निमित्ताने आयोजित रंग भरण स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे.
विजेते स्पर्धक
इयत्ता 5 वी
1) शुभ्रा प्रविण शेळके
2) जान्हवी सुहास माने
इयत्ता 6 वी
1) ज्ञानसी बालाजी फरताडे
2) तहेरीम रहीम शेख
इयत्ता 7 वी
1) स्वराली सुरेश सूर्यवंशी
2) स्वरा संतोष जगदाळे
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे बँकेच्या व विद्यालयाच्या वतीने त्यांच्या सुयशाबद्दल अभिनंदन करण्यात आले.
More Stories
कर्मवीर विद्यालय चारे येथे चित्रकला मार्गदर्शन शिबिर
महाराष्ट्र विद्यालयात शिक्षक – पालक मेळावा उत्साहात संपन्न
नियोजन भवन येथे 7 ऑगस्ट रोजी “Soulful सोलापूर” उपक्रमांतर्गत पर्यटन विकास कार्यशाळेचे आयोजन