विज्ञान विषयाची शालेय स्तरावर आवड निर्माण झाल्यास भविष्यात एखादी विद्यार्थीनी वैज्ञानिक होईल तसेच विज्ञान शाखेमध्ये करिअर च्या संधी निर्माण होतील असे विचार मुख्याध्यापिका सौ. शुभदा जोशी यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना मांडले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संदेश घाडगे यांनी मंडळ स्थापनेचा उद्देश सांगितला आयुब शेख यांनी विविध शास्त्रज्ञांनी लावलेले शोध याबद्दल माहिती दिली व विद्यार्थिनींनी जिज्ञासावृत्ती वाढवावी असे आवाहन केले
मंडळ प्रमुख सौ. उषा वीर यांनी वर्षभरात राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली
विज्ञान मंडळ पदाधिकारी वैष्णवी सपाटे, यशवंती खपाले अनुष्का माळी, सृष्टी माळवदे, अंकिता नवले, श्रद्धा पवार, पवित्रा वाघमारे या विद्यार्थिनींचे मान्यवरांच्या हस्ते गुलाब पुष्प व बॅचेस देऊन अभिनंदन करण्यात आले. कु वैष्णवी सपाटे हिने विज्ञान वार्ता शास्त्रज्ञ जयंती, विविध शोध माहिती, क्षेत्रभेट, वृक्षारोपण असे विविध उपक्रम राबवू असे सांगितले.
More Stories
सोलापूर प्रादेशिक परिवहन कार्यालय, दुचाकी मालिका सुरू- आकर्षक क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन
कार्यकर्त्यांनी स्वता उमेदवार समजून जोमाने कामाला लागावे. आ. राणाजगजितसिंह पाटील
निवडणूक यंत्रणांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांचे निर्देश