Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > क्रीडा > डिसेंबर महिन्यात बार्शी येथे भव्य राष्ट्रीय स्तरावरील व्हॉलीबॉल स्पर्धांचे आयोजन

डिसेंबर महिन्यात बार्शी येथे भव्य राष्ट्रीय स्तरावरील व्हॉलीबॉल स्पर्धांचे आयोजन

मित्राला शेअर करा

व्हॉलीबॉल खेळाचे बार्शी सोबत असणारे नाते खूप जुने आहे या खेळाला बार्शी मध्ये खूप जुना इतिहास आहे. राष्ट्रीय संघातून शेकडो खेळाडू राष्ट्रीय पातळीवर खेळले आहेत त्याच बरोबर संघ नायक(Captain) राहिले आहेत.परंतु अलीकडील बदलत्या काळात विद्यार्थी किंवा कॉलेज मधील युवकांचे मैदानी खेळामध्ये रस राहिलेला नाही.परंतु आज ही बार्शी,भुम,परंडा,करमाळा या भागात व्हॉलीबॉल खेळाशी संबंधित अनेक माजी खेळाडू यशस्वी उद्योजक,व्यापार,अधिकारी, क्रिडा शिक्षक तसेच राजकीय क्षेत्रात उच्च स्थानी दिसून येतात ही बाब उल्लेखनीय आहे.

व्हीडीएफआयच्या राज्यस्तरीय कार्यशाळेत प्राप्तिकर आयुक्त विपुल वाघमारे (शिवाजी महाविद्यालय बार्शी चे माजी व्हॉलीबॉल खेळाडू)यांच्या हस्ते प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र देण्यात आली.यावेळी पी. सी.पांडियन,डॉ.एम.एच. कुमारा,एम.टी.देसाई

हीच बाब लक्षात घेऊन बार्शीतील जुन्या व्हॉलीबॉल खेळाडूनी एकत्र येत डिसेंबर महिन्यात राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचे आयोजन केले आहे.या स्पर्धा डेव्हलपमेंट फाउंडेशन ऑफ इंडिया (VDFI ) यांच्या वतीने घेण्यात येणार आहेत.

व्हॉलीबॉल डेव्हलपमेंट फाउंडेशन ऑफ इंडियाच्या वतीने ( व्हीडीएफआय ) बार्शी ( जि.सोलापूर ) येथे डिसेंबरमध्ये १९ वर्षाखालील खेळाडूंसाठी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा घेण्यात येईल,असे प्रतिपादन प्राप्तिकर आयुक्त , माजी राष्ट्रीय खेळाडू विपुल वाघमारे यांनी केली. ” व्हीडीएफआय ने बाचणी ( ता.कागल ) येथे व्हॉलीबॉल प्रशिक्षकांसाठी आयोजित केलेल्या तीन राज्यस्तरीय दिवसीय ‘ व्हॉलीबॉल प्रशिक्षण पद्धती या कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.

अध्यक्षस्थानी भारतीय वरिष्ठ व्हॉलीबॉल संघाचे प्रशिक्षक पी.सी पांडियन ( तामिळनाडू ) होते.प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.एम. एच.कुमारा ( कर्नाटक ) सांगलीतील ज्येष्ठ क्रीडा शिक्षक एम.टी.देसाई,माजी राष्ट्रीय खेळाडू मिलिंद गोरटे,दीपक बागल प्रा.डॉ.स्वप्नील पाटील,राजेश काटकर,प्रशांत कांबळे उपस्थित होते श्री.वाघमारे म्हणाले व्हॉलीबॉलच्या विकासासाठी सुरू केलेली ही चळवळ वाढवायची आहे.आगामी ऑलिंपिकमध्ये देशाचा व्हॉलीबॉल संघ सहभागी व्हावा,याची तयारी करण्याचे आव्हान प्रशिक्षकांनी घ्यावे.येणाऱ्या खेलो इंडिया स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महाराष्ट्र संघ उभारणीत ‘ व्हीडीएफआय ‘योगदान देणार आहे.

प्रास्ताविक किरण देशमुख यांनी केले. शिवाजी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल प्रशिक्षक अजित पाटील यांनी आभार मानले. समारोपाच्या सत्रात तंदुरुस्ती आणि आहारतज्ज्ञ योगिता पडियार यांचे ‘ खेळाडूंसाठी आहार ‘ विषयाव व्याख्यान झाले.

बार्शीतील व्हॉलीबॉल खेळाडूंनी एकत्र येत डिसेंबर महिन्यात राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचे आयोजन केले आहे.या स्पर्धा डेव्हलपमेंट फाउंडेशन ऑफ इंडिया (VDFI ) यांच्या वतीने घेण्यात येणार आहेत. अशी माहिती क्रिडा मार्गदर्शक, राष्ट्रीय खेळाडू प्रा.किरण देशमुख यांनी दिली.