स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारत देशाचे लाडके पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी, केंद्रीय गृहमंत्री मा. अमितजी शहा, भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष मा. जे.पी. नड्डा, मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात देशासह, राज्यभरात ” हर घर तिरंगा “अभियान सुरू झालेले आहे.
बार्शी शहर व तालुक्यात ” हर घर तिरंगा ” अभियान राबविण्यासाठी आमदार राजाभाऊ राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली व बाजार समितीचे सभापती रणवीर राऊत यांच्या नेतृत्वाखाली, बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीकडुन १० हजार तिरंगा ध्वजाचे वाटप करण्यात येणार आहे.
आज सोमवार दिनांक ८ ऑगस्टपासून शहरातील विविध शाळा व महाविद्यालये, विविध संघटना तसेच बार्शी शहरात प्रभागामध्ये व ग्रामीण भागातील मंडलांमध्ये तिरंगा ध्वज वाटपाची सुरूवात करण्यात आली.
सर्व प्रथम आज सुलाखे हायस्कुल येथे भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून, ध्वज संहितेची माहिती सांगण्यात आली. आजपासून शहरातील महाराष्ट्र विद्यालय, सोजर इंग्लिश स्कूल, सुयश महाविद्यालय, श्री शिवाजी महाविद्यालय, बी.पी. सुलाखे कॉमर्स कॉलेज, शिक्षणशास्त्र महाविद्यालय, श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालय, महात्मा फुले विद्यामंदिर, जिजामाता विद्या मंदिर, बार्शी टेक्नीकल हायस्कुल, शेठ अगरचंद कुंकूलोळ प्रशाला या शाळा व महाविद्यालयांमध्ये स्वयंसेवक, सेवाभावी संस्थाच्या माध्यमातुन तिरंगी झेंडे वाटप केले जाणार आहेत. तरी शहर व तालुक्यात सर्वानी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा करावा असे आवाहन बाजार समितीचे सभापती रणवीर राऊत यांनी केले आहे.
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष असिफ तांबोळी, माजी नगराध्यक्ष रमेश पाटील, शाळेचे मुख्याध्यापक हिरोळीकर सर, माजी नगरसेवक विलास रेनके, भारत पवार, आण्णा लोंढे, दिपक राऊत, युवराज बारबोले, शंकर वाघमारे, संदिप आलाट व विद्यार्थी उपस्थित होते.
More Stories
राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत छत्रपती बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या 11 खेळाडूंचे उज्ज्वल यश
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नवीन नोंदणीसाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद