महाराष्ट्र शासनाच्या वतीने, जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग अंतर्गत सन 2023 24 या वर्षासाठी विविध योजनेतील वैयक्तिक लाभाच्या योजना राबविण्यात येत आहेत.

पात्र लाभार्थ्यांनी सदर योजनेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने दिनांक 8 डिसेंबर 2024 पर्यंत सादर करण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांनी केले आहे
या योजनांमध्ये सदर योजनांचा समावेश करण्यात आला आहे.
राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय दुधाळ गायी म्हशीचे वाटप करणे.
राज्यस्तरीय 1000 मांसल कुक्कुट पक्षी संगोपनाद्वारे कुक्कुटपालन व्यवसाय सुरु करणे.
जिल्हास्तरीय योजना तलंगा गट वाटप करणे. राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय शेळी मेंढी गट वाटप करणे. जिल्हास्तरीय योजना एकदिवसीय सुधारित पक्षांच्या पिल्लांचे गट वाटप करणे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी दुग्धव्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन व्यवस्थापन चे प्रशिक्षण प्रमाणपत्र आवश्यकतेप्रमाणे लागणार आहे.
सदरील व्यवसायाचे शासन मान्यता प्राप्त प्रशिक्षण प्रमाणपत्र मिळण्यासाठी महाराष्ट्र कौशल्य विकास केंद्र 9922914009 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन महाराष्ट्र कौशल्य विकास केंद्राचे मुख्याधिकारी धिरज शेळके यांनी केले आहे.
More Stories
महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकाराच्या कीर्तनसेवेचा मुळेवाडीनगरीत घुमणार गजर
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले
जी. डी. सी. अँन्ड ए. व सी. एच. एम. परिक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदवाढ