Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > कृषी व पशुसंवर्धन > मरावे परी कीर्तिरूपे उरावे! मुलांनी उभारले शेतकरी वडिलांचे मंदिर

मरावे परी कीर्तिरूपे उरावे! मुलांनी उभारले शेतकरी वडिलांचे मंदिर

मरावे परी कीर्तिरूपे उरावे! मुलांनी उभारले शेतकरी वडिलांचे मंदिर
मित्राला शेअर करा

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात असणाऱ्या पांढरी गावातील मुलांनी आपल्या शेतकरी वडिलांचे स्मारक उभारले आहे. हे स्मारक आजच्या काळामध्ये सर्वांनाच आदर्श निर्माण करणारे आहे.

प्रगतशील शेतकरी कैलासवासी मोहन घावटे यांच्या निधनानंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. घावटे कुटुंबाकडे सुरुवातीला केवळ पाच एकर जमीन होती.

मात्र मोहन घावटे आणि त्यांच्या भावाने आज ९० एकर जमीन कष्टाने आणि मेहनतीने कमवली. बार्शी बाजार समितीवर त्यांनी संचालक म्हणून शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व केलं होत. पंचक्रोशीमध्ये मोहन घावटे यांना मदतीला धावणारे आणि प्रगतशील शेतकरी म्हणून ओळखल जात. त्यांच्या निधनानंतर मुलगा गणेश घावटे आणि भावांनी मिळून. आपल्या वडिलांची आठवण कायम राहण्यासाठी सुंदर स्मारक उभारले आहे.