परंतु या ड्रोन चा वापर करून किंवा यात थोडे बदल करून अनेक अवघड कामे सोप्या पद्धतीने करता येऊ शकतात हे ओळखून शासनाने सुद्धा आपल्या ड्रोन संदर्भातील नियमावलीत बदल केला जेणेकरून सामान्य माणसाला दैनंदिन जीवनात या तंत्रज्ञानाचा वापर करता येईल.

मध्यंतरी एका विद्यापीठाच्या टीम ने कमी किमतीचा शेतात फवारणी करणारा ड्रोन निर्माण केला आहे बदलत्या काळानुसार शेतीमध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचा वापरही आवश्यक झाला आहे. ड्रोनच्या मदतीने शेतकऱ्यांचे काम सोपे होते व कमी वेळेत पूर्ण होते यात काही सेंसरचा वापर करून पिकावरील रोग आणि कीड पूर्वीच ओळखता येतात आणि सहज रोखता येतात. ड्रोन तंत्रज्ञानाचे कृषी क्षेत्रातील अनोखे फायदे लक्षात घेऊन कृषी मंत्रालयाकडून ड्रोन तंत्रज्ञानाचा प्रचार केला जात आहे.
यासाठी अनोखा उपक्रम हाती घेण्यात आला आहे . शेतीमध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना त्याबद्दल जागरूक करण्यासाठी, कृषी मंत्रालयाने कृषी विज्ञान केंद्रे (KVKS ) आणि राज्य कृषी विद्यापीठांसारख्या सरकारी ICAR संस्थांना ड्रोन खरेदी करण्यासाठी 10 लाख रुपयांपर्यंतचे अनुदान दिले आहे. या निर्णयामुळे दर्जेदार शेतीला चालना मिळेल, तसेच ड्रोनचे देशांतर्गत उत्पादन वाढण्यास मदत होईल , असे सांगण्यात येत आहे ड्रोन तंत्रज्ञानाचा अवलंब करणे ही काळाची गरज असून त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. देशातील विविध राज्यांमध्ये टोळांचा हल्ला रोखण्यासाठी प्रथमच ड्रोनचा वापर करण्यात आला. मागील वर्षीही अश्याप्रकारची टोळधाड आली होती.
कृषी क्षेत्रामध्ये नवीन तंत्रज्ञानाचा समावेश करण्यासाठी सरकार सतत प्रयत्न करत आहे, जेणेकरून कृषी क्षेत्राची उत्पादकता तसेच कार्यक्षमता वाढविण्याच्या दृष्टीने शाश्वत उपाय शोधता येतील . ICAR संस्था, कृषी विज्ञान केंद्रे आणि राज्य कृषी विद्यापीठांना कृषी यांत्रिकीकरण उप – मिशन ( SMAM ) योजनेअंतर्गत ड्रोनची खरेदी, भाड्याने आणि प्रात्यक्षिकांमध्ये मदत करण्यासाठी निधी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार , ही रक्कम कृषी यंत्रसामग्री प्रशिक्षण आणि चाचणी संस्था , ICAR संस्था , कृषी विज्ञान केंद्र आणि राज्य कृषी विद्यापीठांना ड्रोन खरेदीसाठी अनुदान म्हणून दिली जाईल. ड्रोनमध्ये मल्टी – स्पेक्ट्रल आणि फोटो कॅमेरे अशी विविध वैशिष्ट्ये आहेत. सर्वेक्षण पीक निरीक्षण, रोपांची वाढ आणि कीटकनाशकांवर खते आणि पाणी शिंपडणे यासह शेतीच्या अनेक बाबींमध्ये याचा वापर केला जाऊ शकतो .
More Stories
महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकाराच्या कीर्तनसेवेचा मुळेवाडीनगरीत घुमणार गजर
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले
जी. डी. सी. अँन्ड ए. व सी. एच. एम. परिक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदवाढ